Supriya Sule Politics: ‘मत चोरी’ प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी दिले निवडणूक आयोगाला आव्हान, म्हणाल्या, पहिली माझी चौकशी करा!

Supriya Sule; MP Supriya Sule directly challenges the Election Commission in the vote rigging case-निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष कामकाज अपेक्षित असताना, जनतेचा भ्रमनिरास झाला
Supriya-Sule
Supriya-SuleSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule News: देशभर चर्चेत असलेल्या मतचोरी प्रकरणाला खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. या संदर्भात वैधानिक संस्थांनी जनतेतील विश्वास कायम ठेवणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोळ करणे आणि मत चोरी असे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हा प्रश्न देशभर चर्चेत आला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचा पुनरुच्चार करीत निवडणूक आयोगाला गंभीर प्रश्न केले आहेत. त्या म्हणाल्या वैधानिक संस्थेने जी भूमिका पार पाडायला पाहिजे त्यात निवडणूक आयोग कमी पडला. देशातील तीनशे खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला. त्यांना अटक करण्यात आली. असे यापूर्वी कधी घडले नाही.

Supriya-Sule
Supriya Sule : "मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं"; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर फडणवीसांनी एका वाक्यातच विषय संपवला

बारामती लोकसभा मतदारसंघात अचानक दीड लाख मते वाढली होती, असा धक्कादायक माहिती त्यांनी दिली. शिरूर लोकसभा मतदारसंघात अनेक मतदारांच्या नावापुढे पत्ताच नाही. घर नंबर नाही. अशी स्थिती अनेक ठिकाणी असेल. त्यामुळे हा प्रश्न निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे होता.

त्या म्हणाल्या, राज्यातील महायुती सरकार कसे सत्तेत आले? हा प्रश्नच आहे. तुम्हाला सत्तेत यायचे असेल तर मेरिट वर या. ते करून पास होऊ नका, असा चिमटा त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेतला. आम्ही कोणताही शॉर्टकट वापरलेला नाही. जनतेच्या मतांच्या विश्वासाने विजयी झालो.

विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३२ जागा सत्ताधारी महाविकास आघाडीने जिंकल्या. हे कसे होऊ शकते? याबाबत अनेकांना शंका आहे. आम्हाला एवढे बहुमत असते तर आम्ही रामराज्य आणले असते. मात्र सध्या महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाले आहे, अशी टीका खासदार सुळे यांनी केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com