Thane News : कामात हलगर्जी करणे ठाणे महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचा चांगलेच भोवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने तातडीने त्यांच्यावर निलंबणाची कारवाई करत दोघांना नोटीस बजावली आहे.
मुख्य अग्नीशमन अदिकारी गिरीश झळके, सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनोर, कार्यकारी अभियंता ऋषिकेश जवळकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर, यासिन तडवी, घनश्याम फर्डे या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,नवरात्रोत्सवाच्या विसर्जनावेळी निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती घाटवर करण्यात आली होती. मात्र, हे अधिकारी संबंधित ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तसेच, आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख आणि सुरक्षा विभागच्या प्रमुखांना देखील नोटीस बजावली.
देवीमूर्ती विसर्जनावेळी गर्दी होत असते. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करत नियुक्तीच्या ठिकाणी अनुपस्थित राहिले. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मधील नियम 14(1) अन्वये या अधिकाऱ्यांचे निलंबन केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विसर्जनाच्या दिवशी संबंधित अधिकारी घाटावर उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेत उत्सव व्यवस्थापनात अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेत तत्काळ त्यांचे निलंबन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.