Pune News : महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पुणे शिक्षक मतदारसंघाता भाजपच्या विरोधात अपक्ष लढणाऱ्या सचिन सानप यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी सानप यांना पाठींबा देण्याबाबत भूमिका मांडली होती. पक्ष वाढीसाठी ते आवश्यक असल्याचे म्हटले होते. अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्येकाला आपला पक्ष वाढ करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पाठींबा हा सचिन सानप यांना असल्याचे स्पष्ट केले. सानप यांनी मंत्री उदय सावंत यांचे एसओडी म्हणून देखील काम केलेले आहे. त्यांनी शिवसेनेतून उमदेवारी देखील मागितली होती. मात्र, ही जागा भाजपला सुटल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना शिवसेनेने सानप यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप नेते शिवसेनेच्या या भूमिकेवार टीका करत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी विधान परिषद निवडणुकीबाबत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत खलबतं झाली होती. तेव्हा अपक्ष उमेदवार सचिन सानप हे देखील तेथे होते. त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना पाठींब्यासाठी विनंती केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.