Eknath Shinde supporters celebrate as Shinde-led Shiv Sena secures decisive victory in Thane Municipal Corporation elections, outperforming the Uddhav Thackeray faction by a wide vote margin. Sarkarnama
मुंबई

Thane Mahapalika : ठाणे एकनाथ शिंदेंचेच! उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांचा महापालिकेत पालापाचोळा; पक्षाला लोकसभेपेक्षा कमी मते

Thane Municipal Election : ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत दुप्पट मते मिळवत शिंदेंनी ठाण्यावर आपली सत्ता आणि नेतृत्व अधिक मजबूत केले.

राहुल क्षीरसागर

Thane Shivsena Politics : ठाणे पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम संपली असून निवडणुकीसाठीची मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली. यामध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध करीत ठाणे पालिकेवर भगवा फडकाविला आहे. दुसरीकडे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेनेच्या तुलनेत निम्मी मते मिळवीत कडवी झुंज दिल्याचे दिसून आले.

शिवसेनेने 10 लाख 18 हजार 425 मते मिळवली आहेत. तर, उद्धव ठाकरे गटाला 4 लाख 24 हजार 212 मते मिळाली आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून राजन विचारे यांना जवळपास 5 लाख 17 हजार मते मिळाली होती. त्यामुळे या निवडणुकीत उद्धव ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उमेदवार निवडून आणण्यात यश आले आहे.

ठाणे महापलिकेच्या निवडणुकीची धामधूम मागील 12 ते 15 दिवसांपासून सुरु होती. ‘आवाज कुणाचा’ अशा घोषणा देत, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचाराचा धुराला उडवून दिला. अशातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन झाल्यानंतर व दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ठाणे पालिकेची निवडणूक पार पडली.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आघाडी करीत निवडणुकीला सामोरे गेले. तर, दुसरीकडे शिवसेना व भाजप यांनी युती करीत रिंगणात उतरले होते. त्यामुळे युती विरुद्ध आघाडी असा काहीसा सामना रंगल्याचे काही प्रभागात प्रचार दरम्यान दिसून आले. अशातच ठाणे पालिकेत स्थापनेपासून शिवसेनेची सत्ता आहे. अशातच शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाणे पालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने त्यासाठी शिवसेनेसह ठाकरे सेनेने देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून शड्डू ठोकल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेण्यऐवजी प्रचार रली, बाईक रली काढण्यावर भर दिला. तर, शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेने ठाकरे बंधूंच्या सभेचे आयोज केले होते. त्यामुळे ठाणे पालिका निवडणुकीत परिवर्तन होईल अशी अपेक्षा दोन्ही पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, शिवसेनेने विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवीत ठाणे पालिकेव निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. दुसरीकडे दोन्ही शिवसेनेला मिळालेल्या मतांचा विचार केल्यास शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेनेच्या तुलनेत निम्मी मते मिळाली असल्याचे दिसून आले आहे.

लोकमान्य, माजीवाडा व कोपरीत ठाणे महापलिका निवडणुकीत शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाने कडवी झुंज दिल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लोकमान्यनगर प्रभागातून ठाकरे सेनेला सर्वाधिक 1 लाख 8 हजार 664 मते मिळाली असून त्यापाठोपाठ माजीवाडा प्रभागातून 67 हजार 858 तर, कोपरी नौपाडा प्रभागातून 62 हजार 748, उथळसर 51 हजार 613 मते मिळाली असल्याची माहिती आकडेवारी वरून समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT