Sharad Pawar Pramila Keni Eknath shinde  sarkarnama
मुंबई

Thane Municipal Elections : पवारांची साथ सोडून शिंदेंसोबत गेले पण तिकीट नाकारलं; 'त्या' निर्णयाने कळव्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, प्रमिला केणी अपक्ष

Thane Eknath Shinde Pramila Keni : ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत इच्छुक उमेदवारांनी बंडाचा झेंडा उभारण्यास सुरुवात केली आहे. कळव्यामधून प्रमिला केणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane News : उमेदवारी मिळणार की नाही यासाठी उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले होते. आघाडी युतीच्या चर्चेत उमेदवारी यादी जाहीर करण्यास झालेला उशीर आणि ऐनवेळी तिकीट नाकारल्याने अनेक इच्छुकांचा बांध फूटला. निवडणुकीसाठी पक्षांतर करणाऱ्यांचे अंदाज देखील सपशेल चुकले. ठाण्यात एकनाथ शिंदेंनी उमेदवारी जाहीर करताना अनेक दिग्गजांना घरी बसवले.

शरद पवारांची साथ सोडून शिंदेंसोबत आलेल्या माजी नगरसेविका प्रमिला केणी यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मागील महापालिकेत त्या सर्वाधिक मताने निवडून आलेल्या उमेदवार होत्या. मात्र, शिंदेंनी धक्कातंत्राचा वापर करत त्यांना देखील तिकीट नाकारले. त्यांच्या जागी मिलिंद पाटील यांच्या पत्नी मनाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने कळव्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

उमेदवारी नाकारल्यानंतर प्रमिला केणी यांनी बंडाचा झेंडा फडकवत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुकुंद केणी आणि प्रमिला केणी हे दोघेही निवडून आले होते.कोरोना काळात मुकुंद केणी यांनी निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी पुत्र मंदार केणी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र, केणी कुटुंबाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

ते पदाधिकारीही नाराज

उमेदवारी जाहीर होण्याच्या दिवशी शिंदेंच्या शिवसेनेकडून केणी कुटुंबात एकालाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट केले होते. महिलांची जागा म्हणून मनाली पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे प्रमिला केणी यांना तिकीट देता येणार नसल्याचे सांगण्यात आले. मिलिंद पाटील हे पक्षात प्रवेश करताना सात ते आठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आले होते. मात्र, त्यांना देखील उमेदवारी मिळू शकली नाही.

निवडणूक लढण्यावर ठाम

प्रमिला केणी यांनी सांगितले की,मागील निवडणुकीत मला सर्वाधिक मते मिळाली होती. माझ्या कामाचा कौल जनतेने दिला होता. आजही जनतेचा पाठिंबा असताना केवळ पक्षात आधी आलेल्या आणि स्वार्थ साधणाऱ्यालाच संधी देण्यात आली. त्यामुळे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT