PMC Election : पवार एकत्र आले पण शेवटच्या दिवशी नाराजीनाट्य रंगले! दोन्ही राष्ट्रवादीत एबी फॉर्मवरून गोंधळ!

PMC Election Ajit Pawar Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 60 ते 70 एबी फाॅर्मचे वाटप करण्यात आले आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या आहेत. मात्र, सोमवारी रात्री दोघांच्या आघाडीच्या जागा वाटपाचे सुत्र ठरले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत कलह उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच चव्हाट्यावर आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अन्य पक्षातील उमेदवारांना प्रवेश देणे सुरू होते. त्याचवेळी त्यांना उमेदवारीची संधीही देण्यात आली, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठांच्या मागणीला डावलून त्यांचेही उमेदवार उपमुख्यमंत्री पवार यांनीच ठरविल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी धावपळ करत 60 ते 70 जणांना उमेदवारी अर्ज दिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 140 पेक्षा जास्त जणांना उमेदवारी अर्ज दिल्याचा दावा केला.

सोमवारी रात्री दोन्ही राष्ट्रवादीचे निवडणूक लढण्याचे तसेच चिन्हाबाबतचे सूत्र ठरले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 125 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने 40 जागा लढण्याचे निश्‍चित झाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानी पवार यांच्याकडून उमेदवारी अर्ज देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जात होता.

भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना या पक्षांमधील नाराज उमेदवारांची अजित पवार यांच्याकडे दोन दिवसांपासूनच मोठी रांग लागली होती. त्यापैकी बहुतांश जणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात येत होती. तर, काही वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या, मागील काही दिवसांपासून उमेदवारी अर्जासाठी पक्षाकडे संपूर्ण प्रक्रिया करणाऱ्या उमेदवारांना मात्र एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

एका उमेदवाराला दोन प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दिल्याबद्दलही प्रश्‍न उपस्थित केला जात होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 125 हून अधिक जणांना उमेदवारी अर्ज देण्यात आले.

Sharad Pawar Ajit Pawar
Ajit Pawar Politics : अजितदादांनी शेवटच्या क्षणी गेम फिरवला; भाजपच्या बंडखोरांना 'बळ', पुण्यासाठी खास 'रणनीती'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, नेत्यांकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, कार्यकर्त्यांना तिकीट देण्याची मागणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे केली जात होती. त्यांचीही उमेदवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडूनच निश्‍चित केली जात होती. इच्छुकांना पवार यांच्याकडून उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. पक्षाच्या नेत्यांनाही उमेदवारांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा सुरू होती.

60 ते 70 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप

पक्षातील इच्छुक उमेदवार एबी फॉर्म मिळण्याच्या अपेक्षेने निवडणूक कार्यालयाबाहेर थांबले होते. अर्ज भरण्यास शेवटचे एक-दोन तास शिल्लक असतानाही पक्षाने त्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला. अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. हा प्रकार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पक्षाचे नेते अंकुश काकडे यांच्याकडून आपल्या पक्षाच्या 60 ते 70 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

धुसफूस बाहेर आली...

काहींनी एबी अर्ज स्वीकारून तत्काळ आपले अर्ज दाखल केले, तर काही उमेदवारांनी अर्ज घेण्यास नकार दिला. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंगळवारी एबी फॉर्म देण्यावरून नाराजी नाट्य चांगलेच रंगले. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याने दोन्ही पक्षांमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली. त्याचबरोबर दोन्ही पक्ष आता एकत्र निवडणूक लढणार का ? असा प्रश्‍न मंगळवारी घडलेल्या घटनांमुळे उपस्थित होऊ लागला आहे.

Sharad Pawar Ajit Pawar
BJP Congress भाजपसोबत काँग्रेसचं ‘सेटिंग ? आघाडी तोडल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीची शंका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com