Black Diwali Manoj Pradhan sarkarnama
मुंबई

NCP SP Politics : ठाण्यात साजरी झाली 'काळी दिवाळी', शरद पवारांचा जिल्हाध्यक्ष सरकारवर तुटून पडला

Black Diwali Manoj Pradhan : अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत आला आहे. मात्र, सरकारकडून अजुनही पुरेशी मदत मिळालेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काळी दिवाळी साजरी करण्यात आली.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Politics : पॅकेजच्या नावाखाली या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केली आहे. दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरलं. सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा "क" शब्दही उच्चारायला तयार नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत न करणाऱ्या महायुतीवर जोरदार टीका केली.

मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करीत "काळी दिवाळी" साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करीत आहेत, असा आरोप देखील प्रधान यांनी यावेळी केला.

हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केलं. पण आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्याने रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि यासह इतर सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७५ हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करावा, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरीत मिळावी,  शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT