Thane Bank Election Nilesh Sambare Win sarkarnama
मुंबई

Thane Bank Election : ठाणे-पालघर जिल्हा बँक निवडणूक! निलेश सांबरेंचा विजय, प्रस्थापितांना जोरदार धक्का

Nilesh Sambare Win : निवडणुकीपूर्वी ज्या प्रस्थापितांनी निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्यांच्या विरोधात सांबरे यांनी विजय मिळवला आहे.

राहुल क्षीरसागर

Nilesh Sambare News : ठाणे-पालघर जिल्हा बँक निवडणूक ही महायुती विरुद्ध महायुती अशीच होत होती. एकनाथ शिंदे-हितेंद्र ठाकूर-किसन कथोरे यांच्या युती विरोधात भाजपचे माजी खासदार कपिल पाटील यांच्या लढत होती. या प्रस्थापितांच्या लढतीमध्ये दोन मुख्य पॅनलमध्ये स्थान न मिळालेल्या निलेश सांबरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

विक्रमगड तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातून निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना धुळ चारत विजय संपादन केला असून, त्यांची संचालकपदी निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध त्यांनी अत्यंत अटीतटीची लढत दिली. या लढतीत अवघ्या १०० मतांचेच अंतर राहिल्याने, सांबरे यांनी प्रस्थापितांच्या वर्चस्वाला आणि गडाला मोठे सुरुंग लावल्याची चर्चा आहे.

निवडणुकीपूर्वी ज्या प्रस्थापितांनी निलेश सांबरे यांना आपल्या पॅनेलमध्ये स्थान देण्यास नकार दिला होता, त्याच प्रस्थापितांना या निकालाने सांबरेंनी आपली ताकद दाखवून दिली. पाठीशी कोणत्याही मोठ्या पॅनेलचा किंवा राजकीय गॉडफादरचा आधार नसतानाही, सांबरे यांनी स्वतःच्या बळावर मोठा विजय मिळवला.

हा जनतेच्या विश्वासाचा विजय: निलेश सांबरे

निलेश सांबरे म्हणाले, "हा विजय माझ्या सामाजिक कामावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे. सभासदांची हीच साथ आमची खरी ताकद आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शक, प्रामाणिक आणि केवळ सभासदांच्या हिताचे काम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील, हा माझा शब्द आहे."

हितेंद्र ठाकूरांची जादू चालली

बँकेवर गेली १० वर्षे सहकार पॅनलचे सर्वोसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. आज झालेल्या मत मोजणीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवाल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजूनही असल्याचे दाखवून दिले आहे.वसई विरार मधील चारही जागा निवडून अनन्या बरोबरच पालघर जिल्ह्यातील ४ जागा हि निवडून आणण्यात हितेंद्र ठाकूर यांचा मोठा वाटा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT