Sting Operation : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर खळबळ; 'त्या' व्यक्तीचा जीव धोक्यात? मविआच्या नेत्याच्या आरोपाने राजकारण तापले

Rajesh Latkar Reaction On Shivsena MLA Rajesh Kshirsagar Sting Operation : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आल्यापासून आता नवे नवे दावे समोर येत आहेत.
Shivsena MLA Sting Operation Controversy; MLA Rajesh Kshirsagar and Eknath Shinde
Shivsena MLA Sting Operation Controversy; MLA Rajesh Kshirsagar and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे स्टिंग ऑपरेशन बाहेर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर ते स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी केला आहे.

तसेच तो व्यक्ती सध्या आज्ञास्थळी असून आमदार राजेश क्षीरसागर यांनी विनाकारण आमदार सतेज पाटील यांच्याकडे बोट दाखवू नये, असा इशारा दिला आहे. तसेच संबंधित व्हिडिओ हा महायुतीच्या भांडणांमधूनच व्हायरल आला आहे का? याची सत्यता तपासावी, अशीही खोचक प्रतिक्रिया राजेश लाटकर यांनी दिली आहे.

संबंधित स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला काल मुंबईमधून पळून लावण्याचे काम आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेले आहे. 'तू जर लेखी माफीनामा लिहून नाही दिलास तर तुझं उलट सुलट करीन', असा दबाव आमदारांच्या कडून टाकला जात असल्याचा आरोप नगरसेवक सुनील मोदी यांनी केला. त्याच्यासाठी आमदारांचे गुंड त्याच्या मार्गावर आहेत.

Shivsena MLA Sting Operation Controversy; MLA Rajesh Kshirsagar and Eknath Shinde
Rajesh Kshirsagar : व्हायरल व्हिडिओवर आमदार क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण; सतेज पाटलांवर गंभीर आरोप करत म्हणाले, "व्हॉईस डबिंग अन् जाणीवपूर्वक..."

मात्र तो देखील तयारीचा माणूस आहे तो यांच्यासमोर वाकणार नाही. व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या दोन व्यक्तींच्या नावे पैसे ऑफिशिअल बँक ट्रान्सफर केलेले आहे. त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. आमच्याकडे देखील सर्व पुरावे आहेत, त्यामुळे या प्रकरणात आमचे देखील चौकशी करावी अशी मागणी सुनील मोदी यांनी केली.

Shivsena MLA Sting Operation Controversy; MLA Rajesh Kshirsagar and Eknath Shinde
Rajesh Kshirsagar: पाच टक्क्यांप्रमाणे 40 लाख दिले! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांने शिंदेच्या आमदाराचे स्टिंग ऑपरेशन करत केला भंडाफोड

आम्ही जर बोगस असून आम्ही जर खोटे असो तर आम्हालाही शिक्षा द्यावी. उद्या त्यांची चौकशी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रशासनाकडे जाणार आहोत. या व्हिडिओ संदर्भात आमदार राजेश शिरसागर यांची एसआयटी चौकशी करणार असल्याची मागणी यावी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com