Akshay Shinde Encounter Sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter : ठाणे पोलिसांनी सांगितली अक्षय शिंदेच्या 'एन्काऊंटर'ची इनसाईड स्टोरी

Thane Police On Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच ठाणे पोलिसांनी या सर्व प्रकरणाची माहिती दिली आहे.

Jagdish Patil

Thane News, 24 Sep : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असतानाच आता ठाणे पोलिसांनी या सर्व प्रकरणाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचं सांगितलं.

तसंच त्याच्यावर संदर्भात नवीन कायद्यानुसार 262,132, 109 आणि 121 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी मयत झाल्या संदर्भातही अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल केल्याचं सांगितलं. पोलिस अधिकारी या प्रकरणाची माहिती देताना म्हणाले, आरोपी अक्षय शिंदे याच्याविरोधात बदलापूर (Badlapur) पूर्व पोलिस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न

तो त्याच्या पत्नीने दाखल केला होता. त्या संदर्भात एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलं होतं. या तपास पथकातील काही पोलिस (Police) अधिकारी काल न्यायालयाचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीर रित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. ते आरोपीला घेऊन येत असताना आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करून जी घटना घडली. यावेळी त्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल

या संदर्भात मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नवीन कायद्यानुसार 262 132 109 121 भारतीय न्यासहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मयत झाला आहे त्या संदर्भात अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल केले असून दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलिस आयुक्तालय करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

'एन्काऊंटर'चा संपूर्ण घटनाक्रम काय?

दरम्यान, ज्या पोलिस अधिकाऱ्याच्या पायाला गोळी लागलेली आहे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र, 'एन्काऊंटर'चा संपूर्ण घटनाक्रम काय?' असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, 'हे तुम्हाल थोड्या वेळाने सांगण्यात येईल, हे प्रकरणाचा सध्या तपास सुरु असल्यामुळे त्यावर जास्त बोलणं योग्य नाही', असं म्हणत पोलिसांनी उत्तर देणं टाळलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT