sharmila thackeray
sharmila thackeray sarkarnama

Sharmila Thackeray : अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून बक्षीस जाहीर

Akshay Shinde encounter : अक्षय शिंदेच्या 'एन्काऊंटर'चं मनसेनं समर्थन केलं आहे. आम्ही पोलिस खात्यासोबत आहोत, असं अविनाथ जाधव यांनी म्हटलं आहे.
Published on

बदलापुरातील दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी 'एन्काऊंटर' केला. तळोजा कारागृहातून ठाण्याला घेऊन येताना अक्षयनं अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. तेव्हा, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षयचा जागीच ठार झाला. अक्षयचा 'एन्काऊंटर' करणाऱ्या दोन पोलिसांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी बक्षीस जाहीर केलं आहे.

"शर्मिला ठाकरे ( Sharmila Thackeray ) यांनी 'एन्काऊंटर' करणाऱ्या दोन्ही पोलिसांना 51 हजार रूपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. मात्र, 51 हजार रूपये महत्त्वाचे नाहीत. पोलिसांच्या जीवावर बेतलं असते," अशी प्रतिक्रिया मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

अविनाश जाधव ( Avinash Jadhav ) म्हणाले, "चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीबद्दल महाराष्ट्रासह देशात चीड होती. त्यानंतर आरोपीनं पोलिसांवर हात टाकून पिस्तूल खेचण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निंदणीय आहे. ज्या व्यक्तीनं तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे पाहिलं नाही. त्याचा 'एन्काऊंटर' झाला, तो योग्य आहे."

sharmila thackeray
Akshay Shinde Case : "अक्षयच्या 'एन्काऊंटर'वरून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करणं दुर्दैव"

"आमचं सरकार असतं, तर आरोपीचा 'एन्काऊंटर' केला असता, असं मी यापूर्वीच बोललो होतो. परंतु, आरोपीनं स्वत:च पिस्तूल खेचून स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. 'एन्काऊंटर'ची घटना योग्य आहे. आम्ही त्याचं समर्थन करतो," असे अविनाश जाधव यांनी म्हटलं.

"'एन्काऊंटवर' करणाऱ्या दोन्ही पोलिसांना 51 हजार रूपयांचं बक्षीस शर्मिला ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. मला वाटतं, 51 हजार रूपये महत्त्वाचे नाहीत. पोलिसांच्या जीवावर बेतलं असते. आम्ही पोलिस खात्याचं अभिनंदन करतो," असं कौतुक अविनाश जाधव यांनी केलं आहे.

sharmila thackeray
Akshay shinde news : अक्षय शिंदेंचा 'एन्काउंटर' अन् नाना पटोलेंचे पाच गंभीर प्रश्न

"मुलींवर अत्याचार झाला, तेव्हा विरोधक कुठे होते?" असा सवाल उपस्थित करत अविनाश जाधव यांनी समाचार घेतला आहे. "आमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि ज्यांच्या कुटुंबात तीन-चार वर्षांची मुलगी आहे, ते सगळेजण आता आनंदित असतील. आरोपीला फाशी दिली पाहिजे, असं म्हणणाऱ्यांचा जीव शांत झाला असेल. विरोधात बोलणाऱ्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आम्ही पोलिस खात्यासोबत आहोत. एखाद्या पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा जीव गेला, असता तर विरोधकांनी काय केलं असतं," असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com