Thane NCP politics sarkarnama
मुंबई

NCP Politics : अजित पवारांनी शरद पवारांचा जिल्हाध्यक्ष पळवला, ठाण्यात बॅनरयुद्ध भडकले; पक्ष ढगात गेला म्हणत, जिव्हारी लागणारी टीका!

Jitendra Awhad vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बॅनरयुद्ध भडकले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरला चोख प्रत्युत्तर अजित पवारांच्या समर्थकांनी दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर देसाई यांना डिवचत बॅनरवर, एका 'ढ' विद्यार्थ्याने शाळा सोडली तर नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही, असा मजकूर लिहिण्यात आला होता. आता, त्याला प्रतिउत्तर म्हणून अजित पवार गटाने देखील शहरात लावलेल्या बॅनरवर 'सर्वांनाच ढ ढ म्हणून पक्षचं ढगात गेलायं.पण, त्या पक्षाच्या ‘रावणाचा’ अहंकार काही मोडत नाही.”असा संदेश लिहित जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे.

ठाणे पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेशाचे सत्र सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाने शहरात बॅनर लावून सुहास देसाईवर टीका केली आहे. चंदनवाडी, गणेशवाडी परिसरात हे बॅनर लावले असून बॅनरवर, ‘एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर, नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही", असा संदेश दिला आहे. या बॅनरमधून पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले आहे. या बॅनरची चांगलीच चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहरात चंदनवाडी आणि गणेशवाडी परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर “एका ढ विद्यार्थ्याने शाळा सोडली तर, नुकसान त्याचे होते. विद्यापीठाचे नाही” तसेच “पोरं शाळा सोडून गेली तर शाळा बंद पडत नाही. पुन्हा नव्याने विद्यार्थी घडविण्याचे काम शाळा मास्तर करतो. आमचा मास्तर लय खमक्या आहे.” आणि “डाॅ.जितेंद्र आव्हाड साहेब हे विद्यापीठ आहे; ते कार्यकर्ते घडवतात! असे संदेश दिले होते. या बॅनरला प्रतिउत्तर देत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कॅडबरी जंक्शन येथे लावण्यात आलेल्या बॅनरवर “सर्वांनाच ढ ढ म्हणून पक्षचं ढगात गेलायं.पण, त्या पक्षाच्या ‘रावणाचा’ अहंकार काही मोडत नाही.”असा संदेश लिहित आव्हाडांवर टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT