Thane Crime News, 25 Sep : ठाणे शहरात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस उपनिरीक्षक किसन भोईर यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी अटक केली असून, चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PSI किसन भोईर हे रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दारूची दुकाने सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार ते संबंधित परिसरात कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी राजू वाल्मिकी हा रस्त्यावरच दारू पित बसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. भोईर यांनी राजू वाल्मिकीला हटकलं आणि पोलिसांच्या वाहनात बसण्यास सांगितले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी राजू वाल्मिकी याने भोईर यांना जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे PSI किसन भोईर जमिनीवर कोसळले. त्यांचे डोके जमिनीवर आदळल्याने गंभीर दुखापत झाली.
या दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपी राजू वाल्मिकी याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास चितळसर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूचा विषय समोर आलेला नाही, तर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का?
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून रात्री-दिवस गस्त घातली जाते. मात्र, त्याच कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यालाच विरोध करून त्यांच्यावर हल्ला होत असेल, तर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे का? असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.