Minakshi Shinde Pradeep Purnekar murder case .jpg Sarkarnama
मुंबई

Pradeep Purnekar Murder Case: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पतीची दोनदा चौकशी, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अनेक जण भेटत ...'

Political News : प्रसार माध्यमाशी संवाद साधताना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Sachin Waghmare

Mumbai News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच यापूर्वी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसानी चौकशी केली. या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती लागली असल्याचे समजते. त्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या,' लोकप्रतिनिधी असल्याने अनेक लोक भेट असतात. ज्या प्रभागात मी राहते, तेथील प्रत्येक व्यक्तीशी माझा संबंध येतो.'

ठाण्यात प्रसार माध्यमाशी संवाद साधताना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. लोकप्रतिनिधी असल्याने अनेक लोक त्यांच्या कामाच्या निमित्ताने भेटत असतात. त्यामुळे या भेटीवरून आरोप करणे चुकीचे आहे. या हत्या प्रकरणात करण्यात येणाऱ्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. या प्रकरणी चौकशीला मला बोलवले तर मी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीचे नाव गोवण्यात आल्यानंतर पोलिसांचे कामकाज आहे, मी आणि माझ्या कुटुंबाकडून कोणताही अडथळा होणार नाही, हे मी पहिल्या दिवशी सांगितले होते. त्यामुळे दोन दिवस माझ्या पतींना चौकशीला बोलावलं, मला बोलवल्यावर मी देखील जाणार. हा पोलिसांच्या कामकाजाचा भाग असल्याचे मीनाक्षी शिंदे (Meenakshi shinde) म्हणाल्या.

ज्या प्रभागात मी राहते, तेथील प्रत्येक व्यक्तीशी माझा संबंध येतो, विरोधकही भेटतात, हे मी सुरुवातीपासून सांगत आहे. प्रत्येकजण काम घेऊन येतो. हीच व्यक्ती भेटते, तीच व्यक्ती का भेटते, असा आरोप करणे चुकीचे असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वीच प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची पोलिसानी मंगळवारी व बुधवारी सलग दोन दिवस सुमारे 17 तास कसून चौकशी केली आहे. राजेंद्र शिंदे आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी समोरासमोर बसवून चाैकशी केली. या तपासात पोलिसांच्या (Police) हाती महत्वाची माहिती असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT