Eknath Shinde News : आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्ने बदलत आहेत. त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षणव्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शालेय शिक्षण विभागाचा सर्वांगीण आढावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपली शासकीय निवास्थानी घेतला. यावेळी राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.
या कृती आराखड्यात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांना सोबत घेणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि प्रेरणादायी उपक्रम राबवणे तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन व योग्य सन्मान देणे, यावर विशेष भर देण्यात यावा असेही सुचवले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची महाराष्ट्रात प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करावी, असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चाकण औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर प्रशासनाकडून विविध कामांना सुरुवात करण्यात आली आहे. या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (रविवारी) चाकण दौऱ्यावर येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.