Pratap Sarnaik’s Dahi Handi: Sholay Theme & ₹25 Lakh Prize Sarkarnama
मुंबई

Dahi Handi World Record: विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदाला मंत्री सरनाईकांची 'संस्कृती' देणार 25 लाखांचे 'लोणी'; यंदाच्या दहीहंडीची थीम ‘शोले’

Pratap Sarnaik Dahi Handi Competition 2025: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे या वर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास बक्षीस जाहीर केले आहे.

Pradeep Pendhare

Biggest Dahi Handi event in Mumbai: दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांच्या बक्षिसाचे लोणी चाखायला मिळणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे या वर्षी जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास हे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात दहीहंडीच्या थरांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

दहीहंडी उत्सवाला अवघे पाच दिवस उरले आहेत. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे (Election) वेध लागल्यामुळे ठाण्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मानाची समजली जाणारी संस्कृती युवा प्रतिष्ठानने यंदा विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन केल्याने गोविंदा पथकांमध्ये चुरस वाढणार आहे.

16 ऑगस्टला वर्तकनगर इथल्या ठाणे (Thane) महापालिका क्रमांक 44च्या पटांगणावर संस्कृती युवा प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रंगणार आहे. पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचे बक्षीस तसेच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्यानंतर दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख व आकर्षक ट्रॉफी, आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 25 हजार व आकर्षक ट्रॉफी, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15 हजार व सन्मानचिन्ह, सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10 हजार व सन्मानचिन्ह, पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

मात्र नऊ थरांचा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे पारितोषिक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा विश्वविक्रम मोडण्यासाठी चढाओढ लागण्याची शक्यता आहे.

दहीहंडीची थीम ‘शोले’

यंदा बॉलिवूडच्या शोले चित्रपटास 50 वर्षे पूर्ण झाली, या निमित संस्कृती दहीहंडी उत्सव या चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली आहे. या माध्यमातून चित्रपटाच्या कलाकारांना ट्रिब्यूट दिले जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT