Kedar Dighe Birthday  Sarkarnama
मुंबई

Kedar Dighe News: केदार दिघेंना आमदारकीचे वेध ? 'भावी आमदार' लिहिलेला केक कापल्याने चर्चा

Kedar Dighe Birthday : केदार दिघे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी आणलेल्या केकवर 'भावी आमदार' असा उल्लेख करण्यात आला होता.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर :

Thane News: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि ठाणे शहर हे समीकरण पाहायला मिळतं. ठाण्यातील राजकारण त्यांच्या नावाशिवाय पुढे जात नाही, असं कायम बोललं जातं. आता दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ठाण्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. केदार दिघे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी आणलेल्या केकवर 'भावी आमदार' असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत केदार दिघे मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका पाहता शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी स्वत: ठाणे जिल्ह्यात दौरा करत शाखांना भेटी देत शिवसैनिकांशी संवाद साधला होता. ठाकरेंच्या या दौऱ्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पूर्वीच्या अखंड ठाणे जिल्ह्यात दिवंगत आनंद दिघे यांना मानणारी मंडळी मोठी होती. अजूनही त्यांच्या नावावर ठाणे, पालघर जिल्ह्यातील राजकारण सर्वच राजकीय पक्ष करताना दिसतात. मात्र, त्यांचे कुटुंब राजकारणापासून दोन हात लांब होते. पण अपवाद फक्त केदार दिघे होते. ते राजकारणात सक्रिय होते, पण पुढे येऊन काम करण्याची संधी त्यांना मिळत नव्हती. मात्र, शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी संधी मिळाली. यात केदार दिघेंनाही संधी चालून आली आणि ते थेट ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख झाले.

शिवसेनेच्या फुटीनंतर अनेकांनी ठाकरेंची साध सोडत शिंदे गटात (Shinde group) प्रवेश केला. पण तरीही केदार दिघेंनी ठाण्यात चांगलाच जंप बसवत ठाकरे गटाची जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यातच आता त्यांच्याकडे शिवसैनिक 'भावी आमदार' म्हणून पाहत असल्याचे त्यांच्या वाढदिवसावरून दिसून येत आहे.

केदार दिघेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी 'भावी आमदार' असा उल्लेख असलेला केक आणत कट केला. तसेच ठाण्यात (Thane) नव्या दिघे पर्वाला सुरुवात झाल्याची बॅनरबाजीही करण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीत केदार दिघे हे नाव चांगलेच चर्चेत असण्याची शक्यता आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT