moriss naranaho, abhishek ghosalkar Sarkarnama
मुंबई

Abhishek Ghosalkar Firing : घोसाळकर-मॉरिसच्या मैत्रीची नवी सुरुवात ठरली अखेरची; गोळीबारामागचे नेमके कारण काय ?

Abhishek Ghosalkar Shot Dead : अभिषेक घोसाळकर हे काही काळ मुंबई महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत. त्यासोबतच मुंबै बँकेचे ते संचालक देखील होते.

Sachin Waghmare

Mumbai Crime News : ठाकरे गटाचे नेते माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे अभिषेक घोसाळकर हे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे काही काळ मुंबई महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत. त्यासोबतच मुंबै बँकेचे ते संचालक देखील होते. अभिषेक हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी भांडणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती.

मॉरिस नोरोन्हा नामक व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. यावेळी चार ते पाच गोळ्या झाडल्या आहेत. काही दिवसापूर्वी मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. त्यावेळी अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच तुरुंगात जायला लागले काय, असा त्यांचा संशय होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली होती. त्यानंतर पैशाच्या कारणावरून दोघांत वाद ही झाला होता, मात्र त्या नंतर दोघांनी पुन्हा जुळवून घेत वाद संपवला होता.

गुरुवारी सायंकाळी मॉरिसने एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिषेक घोसाळकर यांना आमंत्रित केले होते. फेसबूक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांनी मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई बस सोडण्याविषयी सांगत होते. त्यासोबतच सर्वांनी एकत्र काम करुयात, असेही म्हणताना दिसत आहेत.

आयसी कॉलनी, गणपत नगर, कांदळपाडा परिसरात येत्या काळात चांगले काम करायचे आहे. ही सुरुवात आहे, पुढे अजून खूप काम करायचे आहे, असेही या लाईव्हमध्ये बोलताना अभिषेक घोसाळकर म्हणताना दिसतायत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लाईव्हमधून उठत असताना त्यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला. यामध्ये चार ते पाच गोळ्या जवळून झाडल्या आहेत. त्यानंतर अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार दोघात पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेनंतर मॉरिसने स्वतावर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. मॉरिस हा दहिसर परिसरात एनजीओ चालवत होता. त्यासोबतच या परिसरात त्याचा स्वयंघोषित नेता म्हणून वावर होता.

SCROLL FOR NEXT