Arvind Sawant-Sharad Pawar-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Arvind Sawant on controversial statement : तो शब्द शरद पवारांचा नव्हे; तर माझा : अरविंद सावंतांनी वादावर टाकला पडदा

याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका भाषणात नवा खुलासा केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : रिक्षावाला हा शब्द मी वापरलेला आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. पवारसाहेबांची अशी भाषा नव्हती. ही भाषा शिवसैनिकांची आहे, असा खुलासा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला आहे. (That word is not Sharad Pawar's; So mine: Arvind Sawant puts a curtain on the controversy)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. पण, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरला, त्यावेळच्या घडामोडी पुढे येत आहेत. याबाबत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी एका भाषणात नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी २०१९ मध्ये उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचेच नाव सुचविले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्या नावावर आक्षेप नाेंदविला होता. ते म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल पवारांनी उपस्थित केला होता, असा दावा सावंत यांनी केला होता.

अरविंद सावंत यांच्या विधानानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः शिंदे गटाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या विधानावर वाद वाढत असल्याचे पाहून खासदार सावंत यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे. रिक्षावाला हा शब्द पवारांनी वापरलेला नाही, तो शब्द मी बोललो आहे. ती पवारांची भाषा नव्हे. ती शिवसैनिकांची भाषा आहे, असे सावंत यांनी म्हटले होते.

या वादावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, शरद पवार साहेबांनी कायमच सर्वांचा आदर केला आहे. त्यामुळे रिक्षावाला हा शब्द पवारांचा नाही. तो माझा शब्द असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे असंही पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT