Sanjay Shirsat On Ashok Chavan : अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीआधी भाजपत जाणार : शिवसेना नेत्याचे मोठे भाकीत

मी तेवढ्या उंचीचा नेता नाही. अशोक चव्हाण मोठे नेते आहेत.
Sanjay Shirsat-Ashok Chavan
Sanjay Shirsat-Ashok ChavanSarkarnama

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील. सध्याच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत, ते पाहून चव्हाण हे लवकरच भाजपवासी होतील, असे भाकीत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. (Ashok Chavan to join BJP before Lok Sabha elections: Shiv Sena leader's big prediction)

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. मध्यंतरी थांबलेली ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Sanjay Shirsat-Ashok Chavan
Siddaramaiah News : काँग्रेसच्या सिद्धरामय्यांविरुध्द लढण्यास येडियुरप्पांच्या मुलाचा नकार; खासदार प्रतापसिंहांसाठी आरएसएस आग्रही

आमदार शिरसाट म्हणाले की, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी माझी खात्रीलायक माहिती आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी तेवढ्या उंचीचा नेता नाही. अशोक चव्हाण मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील एकंदरीत वातावरण पाहून आता आपण काँग्रेससोबत राहू नये, अशी त्यांची मानसिकता असेल, असे मला वाटते.

Sanjay Shirsat-Ashok Chavan
Subhash Deshmukh Statement : भाजप आमदार सुभाष देशमुखांचं अजब वक्तव्य : ‘फडणवीस यंदा महिलांवर प्रचंड फिदा झालेत...’

काँग्रेस पक्षातच एकवाक्यता नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचं चव्हाण यांच्याशी तसंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतंय की, अनेक दिवसांपासून ज्या घडामोडी चाललेल्या आहेत. त्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये नक्की जातील. अशोक चव्हाण हे मोठे नेते आहेत, पण त्यांनाही काँग्रेस पक्षात नीट वागणूक मिळत नाही, असं एकंदरित दिसतंय. त्यामुळे अशोक चव्हाण निश्तिच भाजपमध्ये जातील, असं मला वाटतंय, असेही शिरसाट यांनी स्पष्ट नमूद केले.

Sanjay Shirsat-Ashok Chavan
Basavraj Bommai News : बसवराज बोम्मई मतदारसंघ बदलणार....मुस्लिम मते निर्णायक ठरत असल्याने शिग्गाव सोडणार?

चव्हाणांच्या प्रवेशासंदर्भात बावनकुळे म्हणाले...

अशोक चव्हाण भाजप प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे चित्र २०२४ पर्यंत खूप बदलेले दिसणार आहे. बोलण्याचे चित्र वेगळे आहे आणि करण्याचे चित्र वेगळे आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत महाराष्ट्राचे भरपूर चित्र बदलेले दिसणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com