Ramgiri Maharaj Sarkarnama
मुंबई

Ramgiri Maharaj : मुस्लिमांच्या भावना दुखवल्या; न्यायालयाकडून 'त्या' व्हिडिओची गंभीर दखल

Pradeep Pendhare

Mumbai News : रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखतील, असे विधान केले होते. हे विधान समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर मुस्लिमांनी संताप व्यक्त केला.

रामगिरी महाराज यांच्या या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

सरला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या भावना दुखवतील, असे विधान केले होते. या विधानानंतर मुस्लिमांनी राज्यभरात रस्त्यावर येत निषेध नोंदवला. ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले. राज्यभरात रामगिर महाराजांवर तब्बल 58 गुन्हे दाखल झालेत. दरम्यान, रामगिरी महाराज यांच्या समर्थनात भाजप (BJP) आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जिल्हानिहाय मोर्चे निघत आहेत. दोन दिवसांपूर्वीन अहमदनगर जिल्ह्यात नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात जातीय आणि धार्मिक तेढ वाढवणारे भाषण केले म्हणून गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधानातून प्रेषित मोहम्मद पैगंबराबाबत चुकीचं विधान करत बदनामी केली. याबाबत मुंबई पोलिस (Police) आयुक्त तथा कांदवली पोलिसांकडे अमीन इद्रिसी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली नाही. यावर अमीन इद्रिसी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याची मागणी केली.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. वकील एजाज नख्वी यांनी याचिकेकर्त्याची बाजू मांडली. वादग्रस्त व्हिडिओतील विधान गंभीर असून, तो समाज माध्यमावरून तत्काळ हटवावा, अशी मागणी केली. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना हा व्हिडिओ हटवण्याचा आदेश केला आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

सायबर पोलिसांची मदत घ्या

रामगिरी महाराज यांच्यावर राज्यभरात 58 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. हे सर्व गुन्हे एकत्रित करून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. या गुन्ह्याची दखल घेत न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर पोलिसांची मदत घ्या, असेही आदेशात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT