Maharashtra Mantrimandal List : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी अद्याप खाते वाटप झालेलं नाही. खाते वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अनेकवेळा बैठकाही झाल्या. त्यानंतर अजित पवारांनी दिल्लीचा दौरा करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली.
तर अजित पवारांना अर्थमंत्रीपद देण्यास शिवसेनेने (शिंदे गट) विरोध दर्शवल्याने हे खाते वाटप रखडल्याची चर्चा होती. मात्र, अखेर खाते वाटपाचा तिढा सुटला असल्याचं आता बोललं जात आहे. या संदर्भात अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया देत खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
"माझ्या माहितीनुसार खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारी दिल्यानंतर मंत्री लवकरच जबाबदारी घेतील. त्यानंतर ते कामाला सुरवात करतील", अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं. "मला याबाबत काही माहिती नाही. हे मला तुमच्याकडूनच (माध्यमांकडून) समजलं आहे", असंही त्यांनी सांगितलं.
"कुणाला कोणतं खातं द्यायचं, हा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. ते जी जबाबदारी देतील, ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. आता हे मंत्रिपद मिळणार, ते मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याबाबत मला काहीही माहिती नाही", असंही अजित पवार म्हणाले. दरम्यान, राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर खाते वाटप जाहीर होणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) मंत्र्यांना नेमकं कोणते खाते देण्यात येणार, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांकडे देण्यात येणाऱ्या संभाव्य खाते वाटपाची याची सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली संभाव्य खाते वाटपाची यादी खालील प्रमाणे दिली आहे.
अजित पवार गटाचे संभाव्य खाते वाटप?
- अर्थ : अजित पवार
- कृषी : धनंजय मुंडे
- सहकार : दिलीप वळसे पाटील
- वैद्यकीय शिक्षण : हसन मुश्रीफ
- अन्न नागरी पुरवठा : छगन भुजबळ
- अन्न आणि औषध प्रशासन : धर्मराव अत्राम
- क्रीडा : अनिल भाईदास पाटील
- महिला आणि बालकल्याण : अदिती तटकरे
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.