Arvind Sawant|Eknath Shinde| 
मुंबई

Arvind Sawant|मुख्यमंत्रीच सगळ्यांना धमक्या देत सुटलेत; अरविंद सावंतांनी डिवचलं...

Eknath Shinde| Arvind Sawant| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आत्मघातकी स्फोट घडवून मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून ही धमकी कुठून आली आणि कोणी दिली, याबाबत तपास सुरु झाला आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांना धमकी आल्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी या धमकीवरुन एकनाथ शिंदेवर पुन्हा टीका केली आहे. ''एकनाथ शिंदेच सगळ्यांना धमक्या देत सुटलेत, राज्य सरकारच सगळ्यांना धमक्या देत सुटलंय, त्यांना कोण धमकी देईल, हाच मुळात मोठा प्रश्न आहे. या सरकारचे मुख्यमंत्री कशा धमक्या देतायेत हे रोज कोणीना कोणतही सांगतयं. कालच नवी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्याला कशी धमकी दिली ते सर्वांनी पाहिलं आहे. पण उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गृहखातं आहे, आता त्यांनीच धमकीच्या चौकशीचे आदेश द्यावेत, खरं काय ते समोर येईलच, की जाणीवपूर्वक हे सर्व सुरु आहे, ते कळेलच, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तर शिंदेंना जीवे मारण्याचे पत्रही मंत्रालयात काही दिवसांपुर्वी पाठवण्यात आले आणि पत्रासोबतच धमकीचा फोनही आला होता. यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे धमकी मिळाल्यानंतर देखील शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. आता त्यांना पुन्हा धमकी मिळाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान, ५ ऑक्टोबरला शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतील बीकेसीवरच्या मैदानात होणार आहे. त्या दृष्टीने देखील पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर देखील यामुळेच काही मोजकेच लोक असतील असंही बोलल जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT