मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी...

Eknath Shinde : शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
CM Eknath Shinde Latest News
CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या असून, तपास सुरू करण्यात आला आहे. (CM Eknath Shinde Latest News)

CM Eknath Shinde Latest News
काय सांगता! आयुक्तांसह अधिकाऱ्यांचा झिंगाट डान्स...नागरिकांनी केलं ट्रोल...

शिंदे यांना यापूर्वीही नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. तर शिंदेंना जीवे मारण्याचे पत्रही मंत्रालयात काही दिवसांपुर्वी पाठवण्यात आले आणि पत्रासोबतच धमकीचा फोनही आला होता. यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली होती. तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे धमकी मिळाल्यानंतर देखील शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला होता. आता त्यांना पुन्हा धमकी मिळाल्याने यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

CM Eknath Shinde Latest News
औरंगाबाद लोकसभा भाजप लढवणार की शिंदे सेना ? केंद्रीय मंत्र्यांची गुगली..

दरम्यान, ५ ऑक्टोबरला शिंदे गटाचा दसरा मेळावा हा मुंबईतील बीकेसीवरच्या मैदानात होणार आहे. त्या दृष्टीने देखील पोलिसांनी सुरक्षेची तयारी केली असून दसरा मेळाव्याच्या स्टेजवर देखील यामुळेच काही मोजकेच लोक असतील असंही बोलल जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com