CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray 
मुंबई

राज्य मंत्रिमंडळ होणार बैठक; ओबीसी आरक्षणासह एसटी संपावर निघणार तोडगा?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे सांगत या आरक्षणाला स्थगिती दिली. या निर्णयानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे.

ओबीसी आरक्षणावर होणार सविस्तर चर्चा-

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थिगीती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. विरोधकही आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. अशातच, आरक्षण नाही, तर मतदान नाही, असा निर्धार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ओबीसी मतदारांनी केला आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांना (OBC Leaders) आता चांगलाच घाम फुटणार आहे. ओबीसी आरक्षण निर्णय,ओमिक्रॉनचे संकट या विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना-

याचसोबत राज्यावर ओढावलेले ओमिक्रॉनचे (Omicron) विषाणूच्या संकटावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिकच सतर्क झाली असून, हे संकट रोखायचे कसे आणि आणखी कशा पद्धतीच्या उपाययोजना कराव्या लागतील, यावर विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे.

एसटी संपावरही तोडगा निघण्याची शक्यता -

राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही एसटी संपावर (ST strike) ठाम असून, आता राज्य सरकार आणखी कठोर होण्याची चिन्हे आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मागील आठवड्यात कामावर हजर नाही राहिलात तर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले होते. याचमुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करावी का? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत परिवहन मंत्री आज कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची परिवहन विभागाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता राज्य मंत्रिमंडळ बैठकी नंतरच मेस्मा बाबतचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत मेस्मा अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला जाणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  दरम्यान आतापर्यंत  ९९१० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, २०१४ कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती केलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT