Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं तरीही महायुती (Mahayuti) सरकारचा शपथविधी अद्याप रखडला आहे. निकाल लागल्यापासून मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याचं आता उघडकीस आलं आहे.
दरम्यान, महायुतीने अद्याप कोणतं मंत्रीपद कोणाला दिलं जाणार हे जाहीर केलेलं नाही. त्यामुळे राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. अशातच सोशल मीडियावर भाजप (BJP) धक्कातंत्राचा अवलंब करणार असून नुकतेच पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र, या सर्व चर्चा निरर्थक असल्याचं खुद्द मंत्री मोहोळ यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना अखेर पुर्णविराम मिळाला आहे. मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत या चर्चांचं खंडण केलं आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, "समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे.
आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे."
दरम्यान, भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची घोषणा न केल्यामुळे आणि भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहांची भेट घेतल्यामुळे आगामी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मराठा असावा अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यासाठीच मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर आता या चर्चा अर्थहीन असल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं असलं तरी ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रिपद सोडायला नकार दिल्यामुळे शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मुळगावी निघून गेले आहेत. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी लांबवणीवर पडला आहे. तर शिंदेंच्या सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आमची गृहमंत्रिपदाची मागणी योग्यचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता भाजप गृहमंत्रिपद सोडणार का आणि शपथविधीचा मुहूर्त कधी ठरणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.