
Congress Politics : हरियाणा आणि महाराष्ट्रातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेसला पुढील वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक युती आघाडी न करत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. 70 पैकी 70 जागा काँग्रेस लढवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपमध्ये युती होती. मात्र, काँग्रेसच्या आधी आपने ते विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले होते.
देवेंद्र यादव म्हणाले, काँग्रेस आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत नाही. आम्ही सर्व 70 जागांवर निवडणूक लढवू. जिंकल्यानंतर आमचा नेता निवडला जाईल. 'आप' आणि भाजपच्या चुकीच्या कारभारावर जनता नाराज आहे, असे देखील यादव म्हणाले.
दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे नेते प्रियव्रत सिंह यांची 'वॉर रूम'च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्यता दिली आहे. सलग 15 वर्षे दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसने गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची भाजप आणि 'आप'नेही तयारी सुरू केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी भाजपच्या जाहीरनामा समितीची बैठक झाली. महाराष्ट्रात मिळालेल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.