Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

NCP Political News : महायुतीत अजित पवार गटाचा दबदबा वाढणार; केंद्रात 1 अन् राज्यात २ मंत्रिपदं मिळणार

Deepak Kulkarni

Mumbai News : शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाची दिवाळी यंदा जोरात साजरी होणार आहे. घटस्थापनेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे म्हणाले होते.

आता या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार(Ajit Pawar) गटाला १ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एवढंच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यातील सत्तेत सहभागी होत असताना अजित पवार गटाला मत्रिपदांबाबत शब्द देण्यात आला होता. आधी अर्थखातं आणि त्यानंतर पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे अजित पवार गटाने मिळवले. आता मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला पुन्हा १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचाही मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(Cabinet Expansion)

अजित पवार गटाचा दबदबा!

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या आमदारांची वर्णी लागल्यावर महायुतीत अजित पवार गटाचा वरचष्मा असणार आहे. अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा असताना त्यांनी पालकमंत्रिपदे मिळवली. आता राज्यात आणि केंद्रात कॅबिनेटसह २ राज्यमंत्रिपदे मिळणार असल्याने महायुतीत अजित पवार गटाचा दबदबा निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. (Mahayuti Alliance)

यामुळे शिंदे गटाची नाराजी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. अजित पवार सत्तेत आल्याने आधीच काहीसा नाराज असलेला शिंदे गटही मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसलेला. या विस्तारात आमदारांना संधी न मिळाल्यास शिंदे गटाची नाराजी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकाही लढवणार ?

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर एकीकडे निवडणूक आयोगात सुनावणी होत आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकाही लढवण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.

अजित पवार गट या पाच राज्यांच्या निवडणुका लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. आता अजित पवार कुठल्या चिन्हावर निवडणुका लढवणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT