Delhi News: राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सोमवारी महत्वाची सुनावणी पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हासाठीची निवडणूक आयोगासमोरील आजची सुनावणी संपली आहे. आता पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला होणार आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी अजित पवार गटाकडून वकील ॲड.नीरज किशन कौल आणि मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला, तर शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर शरद पवारांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी तयारीसाठी आणखी वेळ मागितला. मात्र, याला अजित पवारांच्या वकिलांनी विरोध केला. यावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली.
शरद पवारांच्या वकिलाने काय युक्तिवाद केला ?
निवडणूक आयोगात अजित पवार गटाने दिलेल्या उत्तरात बहुसंख्य आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा केला. मात्र, हा मुद्दा खोडून काढत शरद पवारांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलाने अजित पवार गटासोबत किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत ? बहुसंख्य आमदार म्हणजे किती ? फक्त आकडा नाही तर नावं सांगा ?, असा युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी केला.
अजित पवार गटाने काय युक्तिवाद केला ?
"आमच्याकडे दीड लाखापेक्षा जास्त शपथपत्र असून, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्यासोबत आहेत. प्रफुल्ल पटेलांच्या सहीनेच नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाहीचा अभाव आहे. पक्षावर कोणताही एक व्यक्ती दावा करू शकत नाही. सध्या पक्षामध्ये अशी परिस्थिती असून शरद पवार हे आपल्या घराप्रमाणे पक्ष चालवतात, असा गंभीर आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.