<div class="paragraphs"><p>Anil Deshmukh</p></div>

Anil Deshmukh

 

Sarkarnama 

मुंबई

अनिल देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा आर्थर रोड तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबईतील न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहेत. तसेच मनी लाँर्डींग प्रकरणात त्यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) याच आठवड्यात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी संपत होती. त्यामुळे आज याबाबत सुनावणी झाली. त्यामध्ये त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली.

मनी लाँर्डींग प्रकरणातही देशमुखांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणातही देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (cbi) प्राथमिक तपासात क्लीन चीट दिल्याचा अहवाल लीक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने देशमुखांच्या चैाकशीचे आदेश नुकतेच दिले आहेत. सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांना आरोपी बनवलेले नसले तरी ते मोठ्या कटाचा भाग असू शकतात. कारण, त्यांना या प्रकरणातील माहिती लीक झाल्याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

सीबीआयने ट्रेन खेचणारे इंजिन सोडून दिलेले दिसते, त्यामुळे केवळ वाहनात प्रवास करणाऱ्यांवरच आरोप केले जातात. मात्र, इंजिन किंवा घोड्याने ओढल्याशिवाय गाडी चालवणे शक्य होत नसते. वरवर पाहता पुष्कळ पुरावे असूनही, असे दिसते की सगळी कारणे माहीत असूनही, याप्रकणाचा मास्टर माईंड सोडून दिला आहे, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

त्यामुळे सीबीआयने या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेची आणि तपशीलाने कालबद्ध चौकशी करावी, असे निर्देश दिले आहेत. याप्रकणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला 4 आठवड्यांच्या आत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT