ज्योतिरादित्य शिंदेंनी बदलला राजघराण्याचा इतिहास; 160 वर्षांत पहिल्यांदाच...

राणी लक्ष्मीबाई आणि शिंदे घराण्याविषयी काही मतप्रवाह आहेत.
Jyotiraditya Scindia

Jyotiraditya Scindia

Sarkarnama

ग्वाल्हेर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी रविवारी राजघराण्याचा इतिहास बदलून टाकला. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmibai) यांच्या समाधीवर जात डोकं टेकवलं. मागील 160 वर्षात पहिल्यांदाच शिंदे घराण्यातील प्रमुखाने राणी लक्ष्मीबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यामुळे शिंदे यांच्या या कृतीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. शिंदे यांनी आपल्या कृतीतून विरोधकांना चपराक लगावल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे यांनी रविवारी ग्लाल्हेरमधील एलिवेटेड रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांच्या समाझीवपळ या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी पोहचले होते. इथे पोहचल्यानंतर शिंदे यांनी प्रकल्पाची माहिती घेण्याआधी थेट समाधी गाठली. शिंदेंना तिकडे जाताना पाहून त्यांचे समर्थक प्रद्युम्न सिंह तोमर हेही धावत मागे गेले. समाधीस्थळी पोहचताच शिंदे यांनी समाधीवर डोकं टेकवलं.

<div class="paragraphs"><p>Jyotiraditya Scindia</p></div>
वरुण गांधी थांबेनात; आता थेट पंतप्रधान मोदींनाच आणलं अडचणीत

शिंदे यांनी समाधीला प्रदक्षिणा घालत पुन्हा नतमस्तक झाले. शिंदे यांच्या या कृतीमुळे त्यांच्या राजघराण्याचा इतिहासच बदलू गेल्याचे मानले जात आहे. शिंदे राजघराण्यावर आतापर्यंत राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात आले आहेत. शिंदे राजघराण्याने 1857 मध्ये इंग्रजांसोबत झालेल्या लढाईत राणी लक्ष्मीबाई यांना मदत केली नव्हती. त्यांनी इंग्रजांना मदत केली होती, असे मानले जाते.

युध्दात राणी लक्ष्मीबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथेच समाधी उभारण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत एकदाही शिंदे राजघराण्यातील कोणताही सदस्य समाधीस्थळी आला नव्हता. मागील 160 वर्षांत राजघराण्यातील कुणीच राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं नव्हतं. त्यावरून शिंदे घराण्यावर टीकाही होत होती. अनेक आरोपही केले जात होते. पण ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी समाधीस्थळी येऊन आरोप करणाऱ्यांना आपल्या कृतीतून अप्रत्यक्षपणे चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com