Mahayuti Government Sarkarnama
मुंबई

Mahayuti Government : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; मंत्र्यांची यादी मंजुरीला दिल्लीला जाणार...

Mahayuti government CM Devendra Fadnavis Delhi BJP high command approves cabinet : राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असून, दिल्लीतील भाजप हायकमांडच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यात महायुती सरकार स्थापन झालं. राज्यातील 173 आमदारांनी शपथ देखील घेतली आहे. आज मविआतील आमदार शपथ घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त कधी, याची आता उत्सुकता आहे.

विशेष अधिवेशनानंतर लगेच विस्तार होईल, अशी चर्चा असतानाच, राजकीय सूत्रांनुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीत हायकमांडच्या हाती असल्याचे माहिती समोर आली.

महायुती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपापली नावे निश्चित करणे, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात मंत्रीपद वाटपावर चर्चा होईल. यानंतर दिल्लीकडून मंजुरी येईल.या प्रक्रियेमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विलंब होईल, असे सध्याचे चित्र आहे.

विधिमंडळाचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले, आमदार संजय शिरसाट यांनी विस्तार 11 किंवा 12 डिसेंबरला होईल, अशी माहिती माध्यमांना दिली होती.

फडणवीस दिवसभर नागपुरमध्ये थांबणार

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या दोन्ही दिवशी शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभेचे अधिवेशन 9 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतर लगेचच 11 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार करणे शक्य नाही. मुख्यमंत्री फडणवीस 12 डिसेंबरला दिवसभर नागपुरात असणार आहेत. यामुळेच 14 तारखेला मुंबईत किंवा तेही शक्य झाले नाही, तर अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबरला नागपुरात नवीन मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.

कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार

महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती मंत्रिपदे आणि कोणला, याचा अंतिम निर्णय झालेला नाही. भाजपला 22, एकनाथ शिंदे शिवसेनेला 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 मंत्रिपदे दिली जाऊ शकतात.

विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद नाही...

विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाणार नाही, याबाबत तिन्ही पक्षांमध्ये सध्या तरी एकमत आहे. मात्र, एक-दोन वजनदार विधान परिषद सदस्यांबाबत ऐनवेळी अपवाद केला जाऊ शकतो. जुन्या मंत्र्यांपैकी एक दोघांना मंत्रिमंडळातून डिच्चू देण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT