
Mumbai News : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं राजकीय वादळ म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरी. पक्षावर दावा सांगणारे खटले न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु विधानसभा अध्यक्षकांनी दिलेल्या निकाल अजून लोकांच्या लक्षात आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वेगळी चिन्हं घेऊन सामोरं जावं लागलं. राज्यात महायुती सरकार स्थापन झालं आहे. विधानसभा अध्यक्ष हे महत्त्वपूर्ण पद आपल्याकडे ठेवण्याचा पक्का निर्धार आणि त्यावर शिक्कामोर्तब देखील भाजपकडून झाला आहे.
राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक निकाल देणारे विधानसभा अध्यक्षपद भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. विधानसभा अध्यक्षपदावर कोण बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल नार्वेकर पुन्हा आघाडीवर आहे. याशिवाय भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे देखील नाव चर्चेत आहे. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी विधिमंडळात सुरू आहे. यात देखील विरोधक-सत्ताधारी आमने-सामने आले आहेत.
विरोधकांनी आज शपथ घेतली नाही. ते उद्या घेणार आहे. यानंतर हंगामी अध्यक्षच्या सुचनेनुसार विधानसभा अध्यक्षाची निवड होईल. आता विशेष म्हणजे भाजपला (BJP) हे महत्त्वाचे पद स्वतःकडेच ठेवायचे आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर पुन्हा अर्ज भरणार आहेत. उद्या राहुल नार्वेकर अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपच्या ठरवल्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी अर्ज भरल्यास ते सलग दुसऱ्यांदा ही जबाबदारी संभाळतील. 8 डिसेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानुसार उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मात्र ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तशी भाजपमध्ये जोरदार कुजबूज सुरू आहे. पण भाजप श्रेष्ठींनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नार्वेकर यांच्यावर विश्वासानं पुन्हा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची गळ घातली आहे. सध्या हंगामी अध्यक्ष म्हणून भाजप आमदार कालिदास कोळंबकर काम पाहत आहेत.
या सर्व घडामोडींवर राहुल नार्वेकर यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, "शपथविधीवर बहिष्कार टाकण्याचा इतिहासात प्रथमच घडत आहे. लोकांच्या मतदानाचा हा अवमान आहे. संसदीय लोकशाहीला अशोभनीय काम आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत बॅलेट पेपरची मागणी का केली नाही? देशात कुठेही नागरिक फिरू शकतात". राहुल गांधी जिथे जातात, तिथे आम्हाला फायदाच होतो. जर त्यांना राजीनामा द्यायचा तर विधानसभा अध्यक्षांकडे द्यावा, असं ते म्हणाले आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत नार्वेकर यांनी, या महत्त्वपूर्ण पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. अनेक सक्षम नेते या पदासाठी इच्छुक आहेत. भाजपने न मागता खूप काही दिलेले आहे. जी जबाबदारी पक्ष देईल, ती पार पाडेन, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.