Namo Mahasanman Shetkari Scheme:
Namo Mahasanman Shetkari Scheme:  Sarkarnama
मुंबई

Namo Mahasanman Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी गुडन्युज; 'नमो महाराष्ट्र महासन्मान शेतकरी योजने'वर आज शिक्कामोर्तब होणार..!

सरकारनामा ब्यूरो

Namo Mahasanman Shetkari Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'नमो महासन्मान शेतकरी निधी योजने'वर आज मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्राप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना वर्षाला अतिरक्त सहा हजार रुपये देणार आहे.

केद्रांच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पिय अधिवेशनात केली होती. त्यानुसार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार (Eknath Shinde Govt) असे दोन्ही मिळून दरवर्षी १२ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. राज्यातील १ कोटी  १५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मे अखेरीस किंवा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. (Farmers News)

योजनेसाठी कोण असतील पात्र?

पीएम किसान योजनेतील शेतकरीच नमो महासन्मान योजनेच्या (Namo Mahasanman Shetkari Scheme) लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच शेतकरी योजनेसाठी पात्र असतील. तसेच, नियमित कर भरणारे, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय कराल?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होतो, तेच बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करायचा आहे. (Maharashtra Politics)

अजूनही राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करण्यात आलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सर्वात आधी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करून घ्यायचे आहे. नाहीतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

वर्षाला लागतील १६०० कोटी

राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी असून. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. योजना सुरु करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडून राज्यातील लाभार्थीं शेतकऱ्यांची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता आणि महाराष्ट्र सरकारकडून शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता आता मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळू शकतो.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT