DRDO director Pradeep Kurulkar : डीआरडीओचे संचालक डॉ.प्रदीप कुरुलकर यांच्या कोठडीत पुणे विशेष न्यायालयाने 12 जूनपर्यंत वाढ केली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या संशयावरून एटीएसने काही दिवसांपूर्वी कुरुलकरांना अटक केली. त्यानंतर झालेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कुरुलकरांची कोठडी आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या कोठडीत 12 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कुरुलकरांवर काय आरोप आहेत?
कुरुलकरांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय त्यांच्यावर आहे. याप्रकरणी त्यांना एटीएसने अटक केली. कुरुलकरांनी व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा संशय आहे. याबरोबरच ते पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याचा दावा एटीएसने केला आहे.
दरम्यान, कुरुलकर हे अजून कुणाच्या संपर्कात होते का? या हनीट्रॅप प्रकरणात अजून कुणाचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास 'एटीएस'कडून करण्यात येत आहे. कुरुलकर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्यात कसे सापडले?
त्यानंतर त्यांनी काय-काय माहिती पाकिस्तानला पुरवली? याबाबतचा तपास करण्यासाठी कुरुलकरांचा लॅपटॉप आणि मोबाईल याआधीच 'एटीएस'ने जप्त केलेलं आहे. या प्रकरणात आता आणखी काय धक्कादायक माहिती समोर येती ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.