Badlapur School Case Sarkarnama
मुंबई

Badlapur School Case : बदलापूर अत्याचार घटनेचे दिल्लीत पडसाद; बालहक्क आयोग तपासासाठी पथक येणार

Badlapur School Case to be investigated by Child Rights Commission : बदलापूर अत्याचारप्रकरणाची पडसाद दिल्लीत उमटले असून, राष्ट्रीय बालहक्क आयोगाने दखल घेत तपासासाठी पथक पाठवणार आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : बदलापुरातील चार वर्षांच्या चिरमुरडींच्या अत्याचारावरून चांगलाच भडका उडाला आहे. बदलापूर बंदमध्ये सहभागी झालेले संतप्त पालक, नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले असून, आरोपीला ताब्यात द्या नाहीतर फाशी द्या, अशी भूमिका घेतली आहे.

पालकांच्या भावना संतप्त असल्याने पोलिस देखील हतबल झाले आहेत. आता या प्रकरणाचे पडसाद दिल्लीत उमटले आहेत. राष्ट्रीय बालहक्का आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, आयोगाकडून या घटनेच्या तपासासाठी पथक पाठवणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी SIT ची मार्फत चौकशीची घोषणा केली आहे.

बदलापुरामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पालकांनी शाळेसमोर (School) आंदोलन सुरू केले. त्यानंतर रेल रोको आंदोलन सुरू केले. आंदोलक एवढे संतप्त झाले की, शाळेचे प्रवेशद्वारे तोडले. यानंतर शाळेत घुसून आंदोलकांनी तोडफोड केली. या जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी काही बळाचा वापर केला. अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. परंतु रस्त्यावर पडलेल्या अश्रूधुरांच्या याच नळकांड्या आंदोलकांनी उचलून पोलिसांच्या दिशेने फिरकावल्या. पोलिसांनी यानंतर काहीशी आक्रमक भूमिका घेतली. त्याला प्रत्युत्तर म्हणून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे बदलापूरमध्ये तणावाचे वातावरण आहे.

अत्याचाराच्या घटनेमुळे अवघे बदलापूर शहर पेटून उठले आहे. पोलिस देखील आंदोलकांसमोर हतबल झाले आहेत. पोलिस आणि आंदोलक पालकांमध्ये खटके उडत आहेत. पालकांच्या संतप्त प्रश्नांसमोर पोलिस (Police) देखील उत्तर देऊ शकत नाहीत. आरोपीला सोडून द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही बघून घेऊ, असा इशारा पालकांनी दिला आहे. या घटनेचे पडसाद आता दिल्लीत उमटले आहेत. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने या घटनेची दखल घेतली असून, तपासासाठी पथक नेमण्यात आले आहे. हे पथक लवकरच मुंबईत दाखल होईल, कारवाईला सुरवात करणार आहे.

काय आहे राष्ट्रीय बालहक्क आयोग

बालकांच्या घटनात्मक कायदेशीर हक्कांचे संरक्षण अंमलबजावणी करणे. तसंच बालकांविषयक धोरणांची आणि कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आयोगाचे मुख्य कार्य आहे. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. या संस्थेवर आयोगाच्या अध्यक्षासह सहा सदस्य असतात. सहा सदस्यांमध्ये दोन महिला सदस्यांचा समावेश असतो. शिक्षण, बाल आरोग्य, काळजी, कल्याण किंवा बाल विकास, अल्पवयीन न्याय किंवा दुर्लक्षित किंवा उपेक्षित मुले किंवा अपंग मुलांची काळजी, बालमजुरी किंवा संकटात असलेल्या मुलांचे निर्मूलन, बाल मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र, मुलांशी संबंधित कायद्याच्या अंमलबजावणीवर आयोगाचे प्रमुख काम असते.

राष्ट्रीय बालहक्क आयोगाचा इशारा

बदलापुरातील घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली असल्याचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिली. केंद्र सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत की, 'पाॅक्सो' प्रकरणात झिरो टॉलरन्स आहे. त्यामुळे या घटनेत जो कोणी दोषी आढळले, त्यावर कारवाई केली जाईल. या प्रकरणात आम्ही स्वतः पथक पाठवणार आहोत. हे पथकाला वेगाने अहवाल सादर करण्याचा आणि पथकाच्या तपासात कोणी अडथळा आणल्यास कारवाईचे संपूर्ण अधिकार दिले आहेत. या प्रकरणात राज्य सरकारने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे, ते योग्यच केलं आहे. परंतु पथकाच्या तपासात कोणी हलगर्जी केल्याचे उघडकीस आल्यावस त्याच्याविरोधात 'पॉक्सो' कलम 19 खाली FIR दखल केला जाईल, असा इशारा अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT