Bharat Gogawale News Sarkarnama
मुंबई

Bharat Gogawale News : 'ज्या राष्ट्रवादीवर खापर फोडून गुवाहाटीला गेलात, त्यांच्याच सोबत जुळवून'; गोगावले म्हणाले...

Bharat Gogawale On Ajit Pawar : राष्ट्रवादीमुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी...

Chetan Zadpe

Mumbai News : शिवसेनेचे ( शिंदे गट) नेते व मंत्रिपदासाठी आस लावून बसलेले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल (अजित पवार गट) प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीमुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर गोगावले यांनी भाष्य केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली आहे. या वेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी (अजित पवार गट) शिंदे-फडणवीस यांच्या सत्तेच्या समीकरणात सहभागी झाल्यामुळे आता मंत्रिपदासाठी आस लावून बसलेल्या आमदार आणि एकूणच शिंदे गटासमोर मोठी अडचणी निर्माण झाली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

ज्या राष्ट्रवादीला विरोध करून शिवसेनेत बंड केलात त्याच राष्ट्रवादीसोबत आता सत्तेत जुळवून घ्यावे लागत असल्याच्या प्रश्नावर गोगावले म्हणाले, "पुढच्या निवडणुका - राजकारणासाठी या नव्या समीकरणाचे काही डाव टाकले आहेत. याच राजकीय डावपेचाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे. याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. यामुळे राष्ट्रवादी सत्तेत सोबत आल्याने काही फरक पडत नाही. आमची काहीच अडचण होणार नाही, असे भरत गोगावले म्हणाले.

मंत्रिपदाबाबत भाष्य -

मंत्रिपदाच्या पहिल्या यादीतच माझे नाव होते. ९ मंत्री आणि आम्ही ११ दावेदार होतो. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यामुळे मी अजूनही थांबलो आहे. आता मंत्रिपद दिलं तरी आनंदच आहे, नाही दिलं तरी आनंदच वाटणार आहे. आमचे नेते मुख्यमंत्र्यांना कसलाही त्रास होऊ नये, अशी माझी नेहमीची भूमिका आहे, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT