Bharat Gogawale News : " मी अजून मंत्रीच नाही, तर पालकमंत्री...!" ; शिंदे गटाच्या भरत गोगावलेंची खदखद

Guardian Minister News : "...तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रिपद राखून ठेवलेलं आहे!"
Bharat Gogawale
Bharat Gogawale Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत आले. या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा रखडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटून अजित पवारांसह काही आमदारांचा एक गट सत्तेत सहभागी झाला. एकीकडे शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. शिंदे गटातील नेतेमंडळी मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेली असतानाच पाठीमागून आलेल्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मंत्रिपदांची शपथही घेतली. तसेच आता त्यांची पालकमंत्रिपदांवर वर्णीही लागली.

तसेच पालकमंत्र्यांच्या निवडीत अजित पवार गटाचा वरचष्मा असल्याचेही दिसून आले आहे. त्यातच आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांनंतर उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Bharat Gogawale
Bhaskar Jadhav On Sanjay Raut: 'आमचेही लोक तोंड खुपसतात...'; भास्करावांनी चक्क संजय राऊतांनाच सुनावलं

शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवर भाष्य केले. गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रिपदावर बोलताना ते म्हणाले, मी अजून मंत्रीच झालो नाही, तर पालकमंत्री कसा होईल. मंत्री झाल्यानंतरच पालकमंत्री होता येईल. तोपर्यंत रायगडचं पालकमंत्रिपद राखून ठेवलेलं आहे. विचारविनिमय सुरू आहेत. त्यातून योग्य ते घडेल असेही त्यांनी सांगितले.

आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात जे काही ठरलं, त्यानंतरच पालकमंत्र्यांची घोषणा केली. अजित पवार(Ajit Pawar) यांना पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं ही चांगली बाब आहे. त्यांचं अभिनंदन! खरंतर पालकमंत्रिपद त्यांना दिलं नव्हतं. कदाचित ते बसून ठरवून त्यांना दिलं असेल, अशी बोलकी प्रतिक्रिया देत गोगावलेंनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं.

रायगड आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदांविषयी गोगावले म्हणाले, प्रथम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे तो निर्णय आहे. मागच्या वेळेला चर्चा झाल्याप्रमाणे कदाचित तो निर्णय झाला नसावा; पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रायगडचं पालकमंत्रिपद(Guardian Minister) सध्या मंत्री उदय सामंतांकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. अडचणीची बाब नाही. उदय सामंतांकडे पहिल्यापासूनच ते पालकमंत्री पद दिलं आहे. जोपर्यंत आमची वर्णी लागत नाही तोपर्यंत त्यांच्याकडे राहील असं मला वाटतं, अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.

Bharat Gogawale
Tanaji Sawant : शिंदेंचे ठाणे, चव्हाणांच्या नांदेडपाठोपाठ आरोग्यमंत्र्यांच्या भूममध्येही चिमुकलीचा तडफडून मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरातच पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग मंत्रिपदांची शपथ घेतली. यानंतर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांची मंत्रिपदी वर्णी लागली. तटकरे या शिंदे सरकारमधील पहिल्या महिला मंत्री बनल्या आहेत. मात्र, शिवसेनेतील बंडावेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडत तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले रायगड जिल्ह्यातील तीन आमदार अद्याप मंत्रिपदापासून दूर आहेत. त्यात आमदार भरत गोगावलेंचा समावेश आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Bharat Gogawale
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com