मुंबई : महावितरण कंपनीमधील 5 हजार विद्युत साहाय्यक पदांची भरती प्रक्रिया सन 2019 पासून प्रलंबित आहे. EWS हा प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे निकाल न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून लावण्याबद्दलचा निर्णय आज आम्ही घेतला आहे. आज विद्युत साहाय्यक पदांचा निकाल जाहीर होणार, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली.
ऊर्जामंत्री राऊत म्हणाले, परंतु विविध न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती व त्यातून मार्ग काढण्याबद्दल आम्ही कसोशीने प्रयत्न करत होतो. मी या खात्याचा कार्यभार घेतल्यापासून ही भरती प्रक्रिया लवकर पार पाडण्याबद्दल विविध स्वरूपाची निवेदन मला प्राप्त होत होती. परंतु विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी फार वेळ लागला, ही बाब खरी आहे. पण आता एक प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गांतील उमेदवारांचे निकाल लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
माझ्या संवेदना नेहमीच बेरोजगार युवक युवतींसोबत राहिलेल्या आहेत. माझी तीव्र इच्छा असुनही न्यायालयीन प्रक्रियेमुळे हा निकाल मला वेळेत लावता आला नाही, त्याबद्दल यापूर्वीही दिलगिरी व्यक्त केली आहे आणि आताही करतो. हे प्रकरण अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे व त्याचा अंतिम निकाल लागण्यास किती कालावधी लागेल हे अजूनही सांगता येत नाही. याकरिता मागील आठवड्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करून मी या विषयावर कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्यादिशेने काम केल्यामुळे आज आपण निकाल घोषित करू शकत आहो, असे ऊर्जामंत्री राऊत म्हणाले.
EWS हा प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गांतील उमेदवारांचे निकाल न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून लावण्याबद्दलचा निर्णय आज आम्ही घेतला आहे. उद्या २ ऑक्टोबर रोजी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज रोजी विद्युत साहाय्यक या पदाचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. एका अर्थाने बापूंना महाविकास आघाडी सरकार अभिनव पद्धतीने अभिवादन करीत आहे. हा निकाल महावितरणच्या वेबसाइटवर थोडयाच वेळात उपलब्ध होईल. यशस्वी उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असेही नितीन राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.