Sanjay Raut News
Sanjay Raut News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Riot: '' छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत...''; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यानंतर एकमेकांवर दगडफेक, हाणामारी आणि पोलिसांसह इतर वाहनांच्या जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारातील एकाचा मृत्यू झाला आहे. संभाजीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

मात्र, आता हिंसाचारावरुन जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला या हिंसाचारावरुन गंभीर आरोप केला आहे.

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, येत्या 2 एप्रिलला संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ही सभा होऊ नये म्हणूनच तिथे तणाव निर्माण करण्यात आला आहे. तसेच संभाजीनगरसह देशात ज्या दंगली झाल्या त्या भाजप पुरस्कृत होत्या असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी राऊत म्हणाले, खेड, मालेगावमध्ये आमच्या सभेला लोकांचा जो प्रतिसाद मिळत आहे. ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. हा त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच निवडणुकांची भीती वाटत असल्यानेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची तणाव निर्माण केला जात आहे. या सरकारची ही अखेरची धडपड सुरू आहे असा हल्लाबोलही राऊतांनी यावेळी केला आहे.

...म्हणून अनर्थ घडला नाही!

अनेक ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली. परंतु दोन्ही धर्माच्या (हिंदू-मुस्लीम) लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली, दंगल होऊच द्यायची नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली, त्यामुळे अनर्थ घडला नाही.

परंतू, २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे. ती सभा होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली सभेला परवानगी मिळू नये यासाठी अशा प्रकारचा तणाव निर्माण केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकही दंगल घडली नसल्याचंही ते म्हणाले.

या दंगली म्हणजे...

सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला धार्मिक तेढ निर्माण करणार्या हिंदुत्ववादी लोकांच्या भाषणांवरुन खडेबोल सुनावतानाच हे सरकार नपुंसक असल्याची टिप्पणी केली होती. तसेच या हे सरकार काही करत नसल्यामुळेच हे सर्व घडत असल्याचं स्पष्ट मत नोंदवलं होतं.

याचाच दाखला देत राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयानं हे सरकार नपुंसक असल्याचं म्हटलं आहे. या दंगली म्हणजे त्यांच्या नपुंसकतेचा पुरावा आहे. दंगली घडवणं, त्यानंतर संबंधितांवर कारवाई न होणं, दंगलखोरांना प्रोत्साहन देणं, हा यांच्या नपुंसकतेचा सर्वात मोठा पुरावा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT