Aditya Thackeray  
मुंबई

तर आदित्य ठाकरे यांची आमदारकी धोक्यात येणार ...

Aditya Thackeray latest news update| विधिमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली मान्यता रद्द केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यानंतर चोवीस तासातच शिंदे सरकारने शिवसेनेला (Shivsena) दूसरा धक्का दिला आहे. विधिमंडळ सचिवालयाने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली मान्यता रद्द केली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील असे पत्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठवले आहे.

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीत असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यानुसार या 16 आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात येणार असल्याची पुष्टी सभापती कार्यालयाने दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेला व्हिप न बजावल्यामुळे शिंदे गटाकडून या सोळा आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचा व्हिप बजावला होता. गोगावले यांनी काढलेला व्हिप पाळणे या आमदारांना अनिवार्य होते. मात्र आदित्य ठाकरेंसह इतर आमदारांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांना मतदान केले आणि व्हिपचे उल्लंघन केले. या मुळे आता शिंदे गटाकडून या सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. तर सुनिल प्रभू यांचीही मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही रद्द करण्यात आली असून त्यांच्याजागी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आली आहे, असे पत्रविधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवले आहे. मात्र यामुळे आता माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमध्ये राहिलेल्या सोळा आमदारांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT