विधानसभेतील पराभवानंतर चोवीस तासात शिवसेनेला दुसरा धक्का

Eknath Shinde | Uddhav Thackeray| Shivsena| एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती.
 Uddhav Thackeray| Eknath Shinde |
Uddhav Thackeray| Eknath Shinde |
Published on
Updated on

मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली तर शिवसेनेला (Shivsena) पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर चोवीस तासात शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे अजय चौधरी यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली होती. आता अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे हेच गटनेता असतील असे पत्र विधिमंडळ सचिवालयानं एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

विधानमंडळ सचिवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांना पाठवून याबाबत माहिती दिली आहे. शिवसेनेच्या वतीने अजय चौधरी यांची गटनेता म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. तर सुनिल प्रभू यांचीही मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही रद्द करण्यात आली असून त्यांच्याजागी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 Uddhav Thackeray| Eknath Shinde |
शिवसेनेत चापलुसांचीच चलती, निष्ठावान सैनिकांनी संपर्कप्रमुखांसमोर व्यक्त केला रोष !

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले, हेच विधिमंडळाचे गटनेता आणि प्रतोत असतील असे विधी मंडळाने स्पष्ट केले आहे. या निर्णायामुळे आता शिवसेनेच्या कायदेशीर अडचणीही वाढल्या आहेत. या प्रकरणी शिवसेना कोर्टात दाद मागू शकते. तर आता महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण, पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.

एकनाथजी शिंदे यांची गटनेते, शिवसेना विधिमंडळ पक्ष आणि श्री भरत गोगावले मुख्य प्रतोद, शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून रद्द करण्यात आलेली निवड ही आता नियम पडताळणी केल्यानंतर कायम करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या स्वाक्षरीने त्यावेळी केलेली अजय चौधरी, गटनेतेआणि सुनील प्रभू, मुख्य प्रतोद यांची निवड रद्द करण्यात आलेली आहे. कायदेविषयक तरतुदींचा उहापोह करून या सर्व बाबी करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार अभिलेखात नोंद सुद्धा घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com