Aaditya Thackeray, Mangesh Kudalkar  Sarkarnama
मुंबई

Political News: ''मुख्यमंत्र्यांना दिलेलं चॅलेंज स्वीकारतो,पण...''; शिंदे गटाच्या नेत्याचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान

Mangesh Kudalkar Reply To Aaditya Thackeray : ठाकरे गटातील नेतेही आमच्या संपर्कात असतात.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News : राज्यातील सत्तांतराला सहा महिने उलटून गेल्यावरही ठाकरे गटाकडून शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आदित्य ठाकरे हेही सातत्यानं शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खुलं चँलेज दिलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान दिलं आहे. त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

शिंदे गटाचे नेते व आमदार मंगेश कुडाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधतानाच त्यांना खुलं आव्हान दिलं आहे. कुडाळकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्यापेक्षा वरळी मतदारसंघात चांगलं काम करून दाखवावं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले वरळीतील चॅलेंज आम्ही स्वीकारतो. पण कुर्ल्या विधानसभा मतदारसंघात येऊन त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावं असं म्हणत मंगेश कुडाळकरांनी (Mangesh Kudalkar) आदित्य ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

तसेच काही लोकांना फक्त बोलण्याची सवय असते. पण आम्ही लोकं बोलणाऱ्यांपैकी नाही तर करुन दाखवणाऱ्यांपैकी आहोत असा टोलाही ठाकरे गटाला लगावला आहे. यावेळी ठाकरे गटातील काही नेतेही आमच्या संपर्कात असतात. त्यांच्या सहकार्यामुळेच कुर्ल्यात चांगली विकासकामं होत आहेत असंही कुडाळकर यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

मुंबईतल्या चेंबूरमधील कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीत माझ्यासमोर उभे राहावे आणि निवडणूक लढावी, असं थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे. जेवढे खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलं आहे.

महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनाही चॅलेंज दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीतून उभे राहा, तुम्ही कसे निवडून येताय, ते मी बघतो असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT