Statue of Chhatrapati Shivaji Maharaj
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget Session : विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलणार; असा असेल नवा पुतळा

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Shivaji Maharaj : मुंबईतील विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांचा पुतळा बदलण्याबाबत विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्या समितीच्या पहिल्या बैठकीत पुतळा बदल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुतळा बदलण्याबाबत स्थापन केलेल्या समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे. या समितीच्या झालेल्या पहिल्या बैठकीत विधानभवन आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बदलण्याचा निर्णय झाला आहे. आता या समितीची पुढील बैठक २० एप्रिल रोजी होणार आहे.

सध्या विधानभवन परिसरात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) सिंहासनावर आरूढ असलेला आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवून तो बदलण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत समितीची स्थापना करण्यात आली. त्यानुसार आता हा पुतळा बदलण्यात येणार आहे.

सध्याच्या पुतळ्यावर नोंदविलेले आक्षेप

सध्या विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत आहेत. त्यामुळे पुतळा प्रभावी वाटत नाही.

असा असणार नविन पुतळा

विधानभवन परिसरात बसविण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा सिंहासनावर आरुढ असेल. नव्या पुतळ्याची उंची नऊ फुटापर्यंत वाढवणार आहे. नव्या संकल्पनेत छत्रपतींच्या डोक्यावर मेघडंबरी बसवण्यात येणार आहे. सर जेजे कला महाविद्यालय नवी प्रतिकृती सादर करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT