Maharashtra Congress  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Congress : काँग्रेसचं ठरलं; नसीम खान, कुणाल पाटील, प्रणिती शिंदेंसह मुरुमकरांवर मोठी जबाबदारी

Nana Patole : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. पक्ष संघटना वाढीसाठी राजकीय नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. याच अनुषंगाने आता काँग्रेसदेखील अॅक्शन मोडवर आली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

काँग्रेसने आगामी निवडणुका पाहता आता विभागनिहाय प्रभारी नेमले आहेत. नसीम खान यांच्याकडे कोकण आणि मराठवाड्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर बसवराज पाटील मुरुमकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर कुणाल पाटील यांच्यावर अमरावती आणि नागपूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया आघाडी'ची स्थापना करत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी करत विभागनिहाय प्रभारी नेमले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT