Ghodganga Sugar Factory : मोठी बातमी ! 'घोडगंगा'वरील संकट टळले; कामगारांचे आंदोलन ९० दिवसांनतर मागे

Workers Stop Protest : हंगामी कामगारांनाही मिळाला दिलासा
Ghodganga Sugar Factory
Ghodganga Sugar FactorySarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या आंदोलनावर अखेर ९० दिवसांनंतर तोडगा निघाला आहे. कारखान्याच्या वार्षिक सभेच्या पूर्वसंध्येला कामगारांनी आपले आंदोलन मागे घतले आहे. यामुळे घोडगंगा कारखान्याचा गाळप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता सभेत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार, याकडे लक्ष आहे.

पन्नास टक्के पगार मिळण्यावर ठाम असलेल्या कामगारांनी तीन पगार आणि इतर काही मागण्या मान्य झाल्याने आपला संप मागे घेतला आहे. कामगारांना ७ ऑक्टोबरला दोन पगार देण्यात येणार आहेत. यानंतर आठवडाभरातच आणखी एक पगार देऊन तीन पगार दिले जाणार आहेत.

तसेच पहिल्या टप्प्यात पगारवाढीतील एक हफ्ता, हंगामी कामगारांचे 'रिटेंशन अलाउन्स'चा एक हफ्ता देण्यात येणार आहे. यासह डिसेंबर २०२३ पर्यंत कामगारांची सर्व थकीत देणी देण्यात येणार असल्याचे आश्वासन कारखान्याच्या प्रशासनाने दिले आहे.

Ghodganga Sugar Factory
Vaidyanath Sugar Factory : अडचणीतल्या बहिणीलाही मदत अन् स्वत:च्या राजकीय बळकटीकरणालाही...

घोडगंगा कारखाना आणि सभासद यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून कामगारांचा संप अखेर मागे घेतल्याचे कामगार नेते महादेव मचाले, पतसंस्थेचे संचालक तात्यासाहेब शेलार व मार्गदर्शक नानासाहेब मासाळ यांनी सांगितले. कामगार आणि कारखाना प्रशासनात यशस्वी चर्चा झाल्याने उद्यापासून कामगार काम सुरू करणार असल्याचे मासाळ यांनी सांगितले. यामुळे कारखान्यापुढील मोठे संकट टळल्याचे बोलले जात आहे.

कारखान्याने दहा महिने पगार केले नसल्याने कामगारांवर आंदोलनाची वेळ आली होती. आंदोलनाला तीन महिने होत आले तरी तोडगा निघत नव्हता. या काळात कामगारांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाल्याचे मचाले यांनी सांगितले होते.

"कारखाना व्यवस्थापनाशी चर्चेला तयार आहोत, पण रखडलेल्या पगारातील ५० टक्के रक्कम मिळावी, यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कामगारांच्या आंदोलनावर प्रशासन आणि कामगारांनी मध्य मार्ग काढून शेतकरी सभासदांचे हित जोपासत अखेर संप मागे घेतला आहे.

Edited By- Ganesh Thombare

Ghodganga Sugar Factory
MLA Sukhpal Khaira Arrest : ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचा आमदार अडकला; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com