Vijay Wadettiwar  Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar On Supreme Court : '' कायद्याच्या चौकटी मोडणाऱ्यांचा सर्वोच्च न्यायालयानेच बंदोबस्त केला; वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

Rahul Gandhi News : '' आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सत्याचा, संविधानाचा, प्रेमाचा विजय..''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : सर्वोच्च न्यायालयात मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा देतानाच सुरत न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. यावर काँग्रेसकडून जल्लोष साजरा केला जात असून नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया दिली जात आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सत्याचा, संविधानाचा, प्रेमाचा विजय आहे. आणि देशात सुरू असलेली हुकूमशाही लवकरच संपवण्यात येईल.

इंडिया, लोकशाही आणि संविधानासाठी हा मोठा दिलासा आहे. दबावतंत्राची राजनीती जी सूरु होती त्या गोष्टींना राहुल गांधी आता मोदी सरकारला करारा जवाब देतील असेही विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) म्हणाले. माझा पायगुण नाही तर राहुल गांधीच्या पायगुणाची देशाला जास्त गरज आहे.

राहुल गांधी यांचं राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण संविधान निर्माण करणाऱ्यांनी देशात कायद्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा विचार केला त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त न्यायालयाच्या निर्णयाने केला आहे असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. ज्याची नियत, भावना चांगली असते त्याला अभिप्रेत काही निकाल असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

भाई जगताप काय म्हणाले...?

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आज एक चपराक लावली आहे. तुमची हुकूमशाही चालणार नाही. आता लवकरच राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करायला हवी, अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT