Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : ठाकरे गटाला मोठं खिंडार, मुंबई महापालिकेतील १७ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार

Thackeray Group Vs Shinde Group : शिंदे गटाकडून ठाकरेंना धक्केवर धक्के....

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : शिवसेनेतील बंडखोरीनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी अॅक्टिव्ह झाले आहेत. नुकताच त्यांनी दोन दिवसीय विदर्भ दौरा केला आहे. या दौऱ्यात ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात रान पेटवण्याचा प्रयत्न करतानाच पक्षबांधणीच्या दृष्टीनं महत्वाचे निर्देश दिले आहेत. एकीकडे ठाकरे गटानं आगामी लोकसभा, विधानसभेसह मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, आता मुंबईत ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.

मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटातून 17 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षविस्तारासाठी आक्रमक पावले उचलली आहे. याचवेळी माजी नगरसेवकांनी शिंदे गटात(Shinde Group) प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेत मोठं भगदाड पडलं आहे.

मुंबई महापालिकेती(BMC)ल शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, सुवर्णा कारंजपे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, दिलीप लांडे, मानसी दळवी,किरण लांडगे,समाधान सरवणकर, अमेय घोले,संतोष खरात, दत्ता नरवणकर, सान्वी तांडेल,आत्माराम चाचे,चंद्रावती मोरे,संजय अगलदरे, सदानंद वामन परब या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला आहे. यातील काही जणांनी अगोदरच शिंदे गटाची वाट धरली आहे.

विदर्भात जिल्हाप्रमुखासह शेकडो शिवसैनिक शिंदे गटात....

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.याचाच भाग म्हणून ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर होते. वाशिम, यवतमाळ येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका घेत ठाकरेंनी अमरावतीत रविवारी रात्री मुक्काम केला होता. मात्र, अमरावतीतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठाकरे नागपूरमध्ये रवाना होत नाही तोच जिल्हाप्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT