Uddhav Thackeray Press Conference : इतरांवर 'भ्रष्टाचाराचे कलंक' लावून त्यांनाच मंत्री केलं, त्याचं काय? ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Uddhav Thackeray Press Conference : "कलंक शब्द एवढं लागण्याचं कारण काय?"
Uddhav Thackeray Press Conference :
Uddhav Thackeray Press Conference : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : 'कलंक' या शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलेले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी काल नागपूरमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कठोर वार केले होते. फडणवीस हे नागपूरला लागलेले कलंक आहेत, असा उल्लेख ठाकरेंनी केला. ठाकरेंनी कलंक हा शब्द वापरल्यामुळे भाजप आता आक्रमक झाली. आज पत्रकार परिषेदेत बोलताना ठाकरेंनी हो हे कलंकीतच असा पुनरूच्चार केला आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Press Conference :
Ramdas Athawale : शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही भाजप सरकारमध्ये यावे!

उद्धव ठाकरे पत्रकार परिषेदेत म्हणाले, "महाराष्ट्रात जिथे जिथे लोक स्वागत करतात तिथे मी बोलतो आहे. साहजिकच जिथे जातो, तिथे सभा होत आहेत. सरकारचं जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष नाही. सरकार लोकांच्या दारातून परत येत आहे. खरंतर लोकांच्या घरी पोहचणं, लोकांच्या घरात योजना लागू होणं, महत्वाचं आहे. योजनांचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांना काम दिलं आहे. आता होऊन जावू दे चर्चा, हे सरकार कामाच्या कागदी होड्या सोडायचं कुठे? एकूणच राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या राजकीय पक्षांकडे पाहून लोकांना उबग येत आहे. एक दिवस जनतेचा लोकशाहीचा विश्वास उडेल. ती रस्त्यावर येतील, पण ती वेळ येऊ नये."

Uddhav Thackeray Press Conference :
Balasaheb Thackeray-Sharad Pawar News : बाळासाहेब ठाकरे वडीलधाऱ्या अधिकाराने शरद पवारांना खडसावतात तेव्हा..

कलंक या शब्दावर प्रश्न विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, "कलंक शब्द एवढं लागण्याचं कारण काय? तुम्ही इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मग तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लावला नाही का? तुमच्या मंत्रिामंडळात हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते. आता त्यांनाच तुमच्या सरकारमध्ये मंत्री केले आहे. त्यांच्यावर आरोप करून आता तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात स्थान कसं दिलं? त्यांच्यावर कलंक लावून आता तुम्ही त्यांना सामावून घेतलं. चक्की पिसिंग - चक्कि पिसिंग असे आरोप करून, असा कलंक लावून आता त्यांनाच सामावून घेतलं, असेही ठाकरे फडणवीसांशी केलं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Election Commission of India
Dharashiv BJP, Shivsena Leader
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com