Mahavikas Aaghadi Rally  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aaghadi Rally : ''१ मे रोजी मुंबईतली 'वज्रमूठ' सभा शेवटची असेल..''; भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं विधान

Maharashtra Politics : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचं ओझं भाजपाला झालं आहे...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला राज्यातील शिंदे सरकारचं ओझं झालं आहे. हे ओझं किती काळ घेऊन फिरायचं असं त्यांना वाटतं आहे. त्याबाबतच्या चर्चा मीही ऐकून आहे विधान केलं होतं.यावर भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर देतानाच महाविकास आघाडीची १ मे रोजी मुंबईत होणारी वज्रमुठ सभा ही शेवटची असेल असं मोठं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi) एकवटली आहे. याचमुळे राज्यात अनेक ठिकाणी वज्रमूठ सभांचा धडाका लावला आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील यशस्वी सभानंतर आता १ मे रोजी तिसरी सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेद्वारे वातावरण निर्मिती करण्यात आघाडीला यश आलं आहे. मात्र, याच सभेवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य केलं आहे.

नितेश राणे(Nitesh Rane) यांनी मुंबई येथे शुक्रवारी(दि.२८) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांसह महाविकास आघाडीवरही हल्लाबोलही केला. राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कुटुंबांना अडचणीत आणायचं आहे असं संजय राऊत यांना दिसतं आहे. कारण राष्ट्रवादीशी निगडीत कारखान्यांचीही चौकशी त्यांना हवी आहे.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचं ओझं भाजपाला झालं आहे असंही बोलले. मी तर हेच म्हणेन की उद्धव ठाकरेंचं ओझं महाविकास आघाडीवर झालं आहे. माझ्या माहितीनुसार, १ मे रोजी होणारी सभा ही मविआची शेवटची वज्रमूठ सभा असेल अशी माझी माहिती आहे यावरही राऊत यांनी बोलावं असंही राणे म्हणाले.

राणे यांनी बारसू प्रकल्पावरुनही संजय राऊतांवर टीका केली. यावेळी राणे म्हणाले, राऊतांनी बारसूचे जमीनदार आहेत. त्यांच्या याद्या जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. माझं तर म्हणणं आहे नक्की करा. काही याद्या आम्हीही जाहीर करतो. जेव्हा बारसूचा विषय सुरु झाला तेव्हा माजी खासदार निलेश राणेंनी काही नावं घेतली होती त्यात बारसूमध्ये कुणाची जमीन आहे ते सांगितलं होतं. काही जमिनी या ठाकरेंशी संबंधित कशा आहेत? हेदेखील सांगितलं होतं. काही नावं जाहीर केली होती.

मालकांना अडचणीत आणायचं तर आणावं...

विनायक राऊत किंवा संजय राऊत यांना नावं जाहीर करायची असतील आणि मालकांना अडचणीत आणायचं असेल तर हरकत नाही. आम्ही पण उद्धव ठाकरेंशी निगडीत लोकांच्या जमिनी कशा आहेत ते आम्ही जाहीर करणार. आम्ही सगळेजण. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार हे सगळे स्पष्ट बोलत आहेत की स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प होईल. संजय राऊत यांना मालकांना अडचणीत आणायचं तर आणावं.

संजय राऊत काय म्हणाले?

बारसूच्या संदर्भात शरद पवारांची भूमिका ऐकली. स्थानिक लोकांशी चर्चा करा. त्यांना विश्वासात घ्या, असं शरद पवार म्हणाले आहेत. म्हणजे काय करायचं? स्थानिकांचा या सरकारवर विश्वासच नाही. सत्ताधारी उद्धव ठाकरे यांचं पत्र दाखवत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावर स्पष्टपणे सांगितलं आहे.

केंद्राकडून वारंवार पर्यायी जागेची मागणी होत होती. म्हणून उद्धव ठाकरे यांनी पर्यायी जागा सूचवली. पण अडीच वर्ष सत्तेत असताना ही जागा मिळावी म्हणून जोर जबरदस्ती केली नाही. लोकांना नको असेल तर बारसूही नको ही आमची भूमिका होती असं संजय राऊत म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT